सातारा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या 13 कोटी वृक्ष लागवडीचा भाग म्हणून व सामाजिक दायित्व सांभाळून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन फॉर वुमेन, साताराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत पेढ्याचा भैरोबा डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
भविष्यासाठी वृक्षारोपण हे किती गरजेचे आहे, हे ओळखून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन फॉर वुमेन, साताराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थीनी कॉलेज परिसर ते भैरोबा डोंगरापर्यंत बीसीए कॉलेजमधील विद्यार्थीनी सामाजिक भान ठेवून व वृक्ष लागवडीचा ध्यास घेवून उत्स्फूर्तपणे चालत गेल्या. यावेळी विद्यार्थीनींनी सुमारे 80 हून अधिक वृक्षांची लागवड केली. यामध्ये काजू, सीताफळ, आंबा, वड, जांभुळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. या सामाजिक उपक्रमात सुमारे 200 प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थीनींनी वृक्ष लागवड करुन वृक्ष लावून ते नुसते जगवायचेच नाहीत, तर प्रत्येकाच्या मनात वृक्षारोपणाचे संस्कार करण्याचा मनोदय केला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. समिक्षा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रताप फडतरे, प्रा. कोमल बडदरे, प्रा. योगिता जाधव, प्रा. नीता साळुंखे, प्रा. सीमा पाटील, प्रा. धाराश्री कदम यांचे या वृक्षारोपण कार्यक्रमात बहुमोल योगदान लाभले.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |