पुसेगाव : कोरोना प्रसार रोखण्यासाठी शासनाने जमावबंदी व संचार बंदी आदेश लागू केला असताना शुक्रवारी ( ता. 3 ) संध्याकाळी सहा वाजता बुध ता. खटाव येथील नागेश वहाबू अडगळे ( वय 32 ) याने सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी न घेता त्याच्या किराणा मालाच्या दुकानात गिऱ्हाईकांची गर्दी करुन त्यांना किराणा मालाची विक्री करताना पोलिसांना आढळून आला.
याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता आम्ही किराणा माल का विकायचा नाही असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा करत सामाजिक सुरक्षा धोक्यात आणल्याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल पुष्कर उमेश जाधव ( वय 28 ) यांनी दाखल केल्यानंतर पुसेगाव पोलिसांनी नागेश अडगळे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आज शनिवारी ( ता. 4 ) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निढळ ता. खटाव येथील जितेंद्र जोतीराम खुस्पे ( वय 35 ) याने तोंडाला मास्क न लावता विनाकारण रस्त्यावरुन फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास घरी जाण्यास सागूनही आपण घरी जाणार नाही असे सांगत त्याने मोठमोठ्याने गोंधळ घातल्याने तसेच कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी असताना व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल असे वर्तन केली असल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी किरण सुरेश देशमुख (वय 33 ) यांनी दिली असून जितेंद्र खुस्पे यांच्यावर पुसेगाव पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |