RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

ऑडिटच्या नावाखाली सातार्‍यातील 'डी-मार्ट'ला टाळे

13 August 2019 at 15:26

अनिश्‍चित काळासाठी राहणार बंद

सातारा : गेल्या काही वर्षांपासून सातारकरांसाठी हक्काचा मॉल असलेला डी-मार्ट काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच बंद झाल्यामुळे आज सकाळी दहा वाजता खरेदीसाठी गेलेल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आज मंगळवारी एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांना सुट्टी असते. अनेक कामगारांसह कंपन्यांमधील अधिकार्‍यांनी खरेदीसाठी धाव घेतली. मात्र, डी-मार्ट ला टाळे असल्यामुळे अनेकांनी तिथून माघारी फिरणे पसंद केले. मात्र डी-मार्ट व्यवस्थापनाने ऑडिटसाठी डी-मार्ट काही काळासाठी बंद असल्याचे सांगितले आहे.

सातार्‍यात मिनाक्षी बझार तसेच विशाल मेगा मार्टही मॉलसदृश्य बझार होते. सातारकर आपल्याला हवी ती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी याठिकाणी येत असत. मात्र विशाल मेगा मार्टला बँकांनी थकित कर्जापोटी टाळे ठोकल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्ट हेच सातारकरांच्या हक्काचे शॉपिंग सेंटर झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून डी-मार्ट मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ग्राहकांनी डी-मार्ट व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. कराड, सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या पुरानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सातार्‍यातील डी-मार्ट मधून खरेदी केली होती. बंगलोरहून बेळगावमार्गे डी-मार्ट ला माल पुरवठा करणारे अनेक ट्रक ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळे डी-मार्ट पर्यंत माल पोहोचू शकला नाही. त्यामुळेच सातारच्या डी-मार्ट मध्ये मालाचा तुटवडा निर्माण झाला होता. कालपासूनच अनेकांनी डी-मार्ट कडे पाठ फिरवली होती. आज दि. 13 रोजी सातारा येथील एमआयडीसीमधील कंपन्यांना सुट्टी असते. त्यामधील अधिकारी तसेच कामगार या सुट्टीदिवशी खरेदी करण्यासाठी डी-मार्ट कडे धाव घेत असतात. मात्र, सकाळी दहा वाजता उघडणारे डी-मार्ट 12 वाजेपर्यंतही उघडले नसल्यामुळे अनेकांनी डी-मार्टच्या गेटमधूनच काढता पाय घेतला. सातारा शहर व डी-मार्ट हे जवळपास 5 ते 7 किलोमीटरचे अंतर आहे. एवढ्या लांबपर्यंत जावून खरेदी होवू न शकल्याने अनेकांनी डी-मार्ट व्यवस्थापनासंदर्भात नापसंती दर्शवली. यासंदर्भात डी-मार्ट व्यवस्थापनाशी 'सातारा टुडे'ने संपर्क साधला असता त्यांनी ऑडिटच्या कामासाठी डी-मार्ट अनिश्‍चित काळासाठी बंद असल्याचे सांगितले.

Vinod Yashwant karandkar

This is true मी आता 7 वाजता संध्याकाळी गेलो होतो , पण खरचं लूज मटेरियल सर्वसाधारण 5 kg लूज मटेरियल बॅग उपलब्ध नाही. Transport प्रोबलेम असेल कदाचित,,,,,
वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

26 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

14 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

14 hours before