02:45am | Feb 12, 2020 |
सातारा : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संविधान जागर अभियानांतर्गत महाविद्यालय स्तरावर पाच ठिकाणी घेतलेल्या संविधान स्पर्धा परीक्षेत सातारा जिल्ह्यात विजेत्या ठरलेल्या सुजाता शिर्के व अमृता देशमुख यांच्यासह 17 विजेत्यांना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व डॉ. शिवाजी पाटील यांच्या हस्ते रोख बक्षीसे व संविधान प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.शिवाजी पाटील म्हणाले, संविधान जागर हा अतिशय आवश्यक असा उपक्रम आहे. भारतीय संविधान हे केवळ नियम, नियमावली नाही तर तो सामाजिक दस्तावेज आहे. संविधानाचा सरनामा हा भारत देशाने स्वीकारलेल्या मूल्यव्यवस्था व तत्वज्ञानाचा मुख्य स्त्रोत आहे.
या स्पर्धेत परीक्षा देऊन सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सादर करतानाचा रंगीत फोटो असलेले व पाठीमागे संविधानातील मूलभूत कर्तव्ये असे उत्तम प्रमाणपत्रांचे वितरण संबंधित महाविद्यालयात करण्यात येणार असल्याचे संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी यावेळी सांगितले. बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व शिवाजी कॉलेज राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते नागरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये पार पडला.याप्रसंगी विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे,उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अॅड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प वाहण्यात आली. त्यानंतर प्रा. सुवर्णा यादव यांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकाचे वाचन केले.
सातारा, वाई, पुसेगाव, रहिमतपुर, उंब्रज आदी ठिकाणच्या पाच महाविद्यालयाच्या केंद्रात एकूण सहाशेचार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये विजेते झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा केंद्र विभागातील प्रथम क्रमांक पटकावणारी छत्रपती शिवाजी कॉलेज विद्यार्थिनी सुजाता शिवाजी शिर्के ( ९४ गुण ) द्वितीय क्रमांकाचे सहा समान नव्वद गुण मिळवणारे राहुल गोंजारी, इंद्रजित घोरपडे , स्नेहल तात्याबा कोळपे, आकाश ज्ञानेश्वर जाधव, सुशांत लालासाहेब फडतरे, पूनम केशवराव कदम, उंब्रज केंद्रावरील परीक्षार्थी कराडचे अभिजीत नामदेव पाटील तृतीय क्रमांक कोमल दत्तात्रय सावंत ( शिवाजी कॉलेज - ८९ गुण )उत्तेजनार्ध - उंब्रज केंद्राचे परीक्षार्थी कराडचे सागर संजय गायकवाड ( ८६ गुण ) व पुसेगाव केंद्रातील प्राजक्ता अनिल लावंड ( ८२ गुण ) तसेच
कॉलेज विभागातील - प्रथम क्रमांक मिळवलेली अमृता संतोष देशमुख ( शिवाजी कॉलेज - ९२ गुण ) द्वितीय क्रमांक - हर्षदा बाळू वाडकर ( किसन वीर कॉलेज, वाई - ९० गुण ) तृतीय क्रमांक - ८८ गुण मिळवणारे - शिवाजी कॉलेचे विश्वजित रंजीत घोपरपडे, मंगेश मारुती गायकवाड व दत्तात्रय नाना खाडे ,उत्तेजनार्थ किसन वीर कॉलेजच्या पद्मा डेश्केट या काश्मीरच्या वाईत शिकणार्या 86गुण मिळवणाऱ्या विद्यार्थीनीस षारितोशिक देऊन गौरविण्यात आले.
परीक्षक म्हणून काम पाहणारे प्रा . डॉ. निळकंठ लोखंडे यांनी यावेळी निकाला बाबत निरीक्षणे नोंदविली आणि सूचना केल्या.
प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांनी प्रस्तावित केले. अॅड. हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. रमेश इंजे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्रा. सुवर्णा यादव व रमेश इंजे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष केशवराव कदम, विनोद यादव, शिवाजी विद्यापीठाच्या बँ. पी. जी. पाटील बहिशाल केंद्राचे प्रा. सूर्यकांत गायकवाड, हेमा सोनी , रखमा , अनिल वीर, प्रा. विलास वहागावकर, कॅप्टन यशपाल बनसोडे आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |