फलटण : फलटण तालुक्यातील एका चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत पिंप्रद, ता. फलटण येथील एकावर गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पिंप्रद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून संशयित आरोपीस कडक शासन व्हावे, यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांना आज निवेदन दिले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी तानाजी दौलत भगत (वय 58, रा. पिंप्रद, ता. फलटण) याने सात वर्षाच्या चिमुरडीस गोड बोलून त्याच्या घरात नेवून दुष्कृत्य केले. ही घटना चिमुरडीच्या आईला समजल्यानंतर तिने या संदर्भात संशयित आरोपीच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीस पोक्सोंतर्गत अटक केली. सातारा येथील न्यायालयात आरोपीस हजर केले असता आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत. दरम्यान, पिंप्रद येथील तानाजी भगत याने चिमुरडीवर अत्याचार केल्यामुळे पिंप्रद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीस कडक शिक्षा व्हावी यासाठी पिंप्रद ग्रामस्थांनी फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन दिले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |