सातारा : रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये सातारा पालिकेचे पाण्याचे गणित ढासळलेले आहे. आज सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षांसह पदाधिकार्यांना राजसपुरा पेठेतील प्रभाग 6 व 12 मधील नागरिकांनी घेराव घालून संताप व्यक्त केला. यानंतर पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी यावर तोडगा काढत उद्यापासून पाणी वेळेवर सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक आल्या पावली परत गेले.
सातारा शहरात उन्हाळ्यामध्ये काहीठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असते. शहापूर योजनेवर पाणी नियोजनाचा मोठा ताण असतो. त्यामुळे अनेकवेळा पाणीवाटपात पालिकेचे गणित बिघडते. सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याची कमतरता सर्वच ठिकाणी भासत आहे. रमजानचा महिना असल्यामुळे राजसपुरा पेठेतील प्रभाग क्र. 6 व 12 मधील नागरिकांनी आज थेट नगरपालिकेवर हल्लाबोल करत उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्केंसह पदाधिकार्यांना घेराव घातला. यावेळी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्याबरोबर जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. शेवटी उपनगराध्यक्ष राजेशिर्के यांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तसेच उद्यापासून सकाळी साडेसहाला पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी सबुरीचे धोरण अवलंबले. त्यानुसार त्यांनी पालिकेतून काढता पाय घेतला. दरम्यान, आज पालिकेत पाण्यासाठी झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे पालिकेचे कामकाज काही तासांसाठी ठप्प झाले होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |