सातारा : मसाप, शाहुपुरी शाखेच्या सहाव्या मराठी भाषा पंधरवडयातंर्गत रविवारी नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये उजेडाशी संवाद हा तिसरा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात स्त्री वादी गाणी, कविता आणि किस्से यांची मैफील चांगलीच रंगली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात व संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान प्रथा कशी रुजली आहे तसेच दैनंदिन जीवनावरील घडामोडिंवर नजर टाकत हसत खेळत कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना वंदना खरे यांची असून त्यांच्या बरोबर अंजली जोशी, मंगला पाध्ये, मित तारा, मुक्ता खरे यांनी कविता सादर केल्या.
मैफीलीची सुरुवात अभंगाने झाली. त्यानंतर अभय करडे यांची मी तुला फुलासारखं जपेन, अरुण कोल्टकर यांची वामांगी, अशोक नायगावकर यांची ज्योतिबा आभार, अश्विनी धोंगडे यांची बरे झाले देवा प्रत्येक पिढीगणिक, एकनाथ ढोकळे यांची मी पुरुष नामर्द, कमला भसीन यांची दरिया की कसम मौजोंकी कसम, किरण येले यांची बाई माजघरात कापते, चिरते, किश्वर नाहीद यांची आय अॅम नॉट दॅट वुमेन, ज्योती म्हापसेकर यांची शिक्षणाची गाडी, दया पवार यांची धरण, धीरुबेन पटेल यांची मी म्हणजे स्वयंपाकघरात कोंडलेली, निर्मला पुतुल यांची सीता नही हु मै, कोण आहे मी तुझी, पुष्यमित्र यांची सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ, प्रज्ञा भोसले यांची बाया धावताहेत, मल्लिका अमरशेख यांची तु तलम अग्नीची पात, माधवी इनामदार यांची रहातयं का कुणाच्या मनात माझ चित्र, यशवंत सुमंत यांची मी काहीही करु शकतो, योगिनी राऊळ यांची कावळे आणि पुरुष सारखेच, रामशंकर यादव यांची औरते रोती जाती है, रेश्मा रामचंद्र यांची मला नाही म्हणायचंय, लता प्र.म. यांची आम्ही काही मैत्रिणी, माझी लेक, कवीची बायको, तिला पहिल्यांदा कविता सापडली, वंदना कुलकर्णी यांची समांतर वाटा, वंदना खरे यांची प्रिय बाई, विंदा करंदीकर यांची करकर करा, शर्मिष्ठा भोसले यांची इथे जन्माआधीच, खुशबुदार झागवाला, गावाकडच्या वाडयात, शिवकुमार पराग यांची गर हो सके तो अब कोई, शीतल पाटील यांची द्यूत खेळण्याची कल्पना कोणाची, सई लळीत यांची तशी ह्यांची काय खट खट नाय, हेमंत जोगळेकर यांची दिवसभराच काम, वारसा, मलासुध्दा पंख फुटले होते या कविता सादर केल्या. दोन कवितांमध्ये संवाद गुंफत, किस्से सांगितल्याने मैफील रंगत गेली.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत संयोजकांच्यावतीने करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. उमेश करंबेळकर यांनी केले त्यांनी शाखेच्या कार्याची माहिती सांगितली. सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. यावेळी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, किशोर बेडकिहाळ, पुरुषोत्तम शेठ, सुभाष सरदेशमुख, हेमा सोनी, वजीर नदाफ, अमर बेंद्रे, अजित साळुंखे, मसाप शाहुपुरीचे कार्यकारिणी सदस्य, मसाप शाहुपुरी शाखेचे सभासद आणि साहित्यिक सातारकर उपस्थित होते.
मराठी भाषा पंधरवडयातील पुढील कार्यक्रम बुधवार 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त, साहित्यिक, गीतकर राजन लाखे यांचे विंदा आणि त्यांची प्रतिभा या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |