01:26am | Nov 13, 2019 |
कराड : मलकापूर शहरातील कचरा, डेंग्यूची साथ, रखडलेली भुयारी गटर योजना व शहरातील रस्त्यांबाबत होत असलेल्या त्रासामुळे नागरिक संतप्त झाल्याचे सांगत दक्षता व अन्याय निवारण समितीने नगराध्यक्ष सौ.निलम येडगे व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासमोर आक्रमक होत समस्यांचा पाढा वाचला. यावर योग्य त्या उपायोजना कराव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देत याबाबत निवेदन नगरपालिकेला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मलकापूरमध्ये अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग आहेत. स्वच्छ व सुंदर मलकापूर म्हणजे कचर्याचे ढीग, दुर्गंधी व डासांचा वावर हे समीकरण आहे का. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरमध्ये कचर्याचे ढीग प्लॅस्टिक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून येतात. ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. रस्त्यावर पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. अनेक रस्ते पहिल्याच पावसात उखडलेले आहेत.
पावसाचे पाणी गटरमध्ये तुंबून त्या ठिकाणी डांसाची उत्पत्ती होत आहे. त्या पाण्यामध्ये डेंग्यू, मलेरिया सारख्या डांचाची पैदास झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहेे. शहरात डेंग्यू, मलेरिया सदृश्य 110 रुग्ण आढळले आहेत. शहरात साथीचे रोग पसरत आहेत. लोक स्वच्छते अभावी आजारी पडायला लागले आहेत. स्वच्छता करणारे कर्मचारी फक्त मुख्य रस्त्यांवरील स्वच्छता करतात. असे हे मलकापूर स्वच्छ व सुंदर म्हणावे का. असा प्रश्न पडतो. स्वच्छतेसाठी 69 कर्मचारी गेली दोन-तीन वर्षे कंत्राटी पध्दतीवर कंत्राटदाराकंडे मजुरीवर काम करतात.
कंत्राटदाराला दरवर्षी एक कोटी एकवीस लाख रुपये दिले जात आहेत. गेली सहा वर्षे सांडपाणी वाहून नेण्यासाठीची भुयारी गटर योजनेचें काम सुरु आहे. साठ कोटी खर्च झाले पण योजना अपूर्णच आहे. त्यामुळे गटार भरुन तुंबली आहेत. नगरपरिषदेचा सर्वच बाबतीत अनागोंदी कारभार चाललेला दिसून येतो. शहरातील नागरिकांची काळजी घ्या, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही समितीने दिला आहे.
योवळी अशोकराव थोरात, दिनेश रैनाक, सुरज शेवाळे, राजू मुल्ला, भास्कर सोळवंडे, प्रशंात गावडे, विक्रम चव्हाण, अजित थोरात, नंदकुमार बागल, आण्णासाहेब काशीद, प्रशांत चांदे, शहाजी पाटील, शंकर बेले, संतोष हिंगसे, जमीर शेख, सूर्यकांत खिल्लारे उपस्थित होते.
नगराध्यक्ष सौ.निलम येडगे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह राजेेंद्र यादव यांनी शहरात केलेल्या उपाययोजना बाबत माहिती दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |