12:23am | Aug 09, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील (जेल) बंदीवानाने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शौचालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित बंदीवानावर मेढा पोलिस ठाण्यात हाफमर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे.
सागर किसन पार्टे (रा.केळघर ता.जावली) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या बंदीवानाचे नाव आहे. कारागृह पोलिस दत्तात्रय ज्ञानदेव चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सागर पार्टे याच्याविरुध्द मेढा पोलिस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असल्याने मेढा पोलिसांनी अटक केली. अटकेच्या कारवाईनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने सातारा कारागृहात (जेल) त्यावी रवानगी करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे बंदीवान सर्कल नंबर 3 च्या बाहेर होते. यातील सागर पार्टे हा लगतच्या शौचालयामध्ये गेला होता. सफाईकामगाराला शौचालयामध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्याने पोलिसांना सांगितले. कारागृह पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घेवून पाहणी केली असता सागर टाईलच्या फरशीने स्वत: हातावर वार करुन घेत होता.
ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला करुन तेथून ताब्यात घेतले. हातातून रक्त आल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, बंदीवानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर कारागृहात खळबळ उडाली. दुपारी उशीरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सागर पार्टेवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |