कराड : मी मुख्यमंत्री असताना विरोधी आमदारांची कधीही विकास कामांबाबत अडवणूक केली नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मी शिफारस केलेल्या कामांना बाजूला ठेवले गेले नाही. म्हणून मला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींचा विकास करता आला. मतदारसंघातील ही विकासाची घडी आणखी चांगली बसवण्यासाठी मला आशीर्वाद द्या. गावपातळीवरील आप-आपसाधील मतभेद बाजूला ठेवून तुमच्या सर्वांगीण विकासाकरिता श्रीनिवास पाटील आणि मला साथ द्या. असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
तुळसण, विठलवाडी, पाचूपतेवाडी, नांदगाव, पवारवाडी येथे प्रचारार्थ निघालेल्या दौर्यात ते बोलत होते. ते म्हणाले, मी आमदार निधीपेक्षा कितीतरी जादा पटीने विकासकामे आणली. विधानसभेत त्या ताकदीचा प्रतिनिधी असला, तर हे शक्य आहे. कराड दक्षिणेतील जनतेच्या आशीर्वादामुळे मला खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या पायर्या चढता आल्या. हे मी कधीही विसरणार नाही. माझ्याकडून विकासकामांच्या बाबतीत कधीच राजकारण होत नाही. येथूनपुढेही ते होणार नाही. तुम्हीही विकासाबाबत कधीही माझ्याकडे या. त्यासाठी माझी कायम मदत राहील.
ते म्हणाले, या विभागातील जनतेने दबावाला घाबरू नये. तुम्ही कष्टकरी व स्वाभिमानी आहात. दहशत असेल तर मुळीच घाबरू नका. मी सदैव तुमच्याबरोबर आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी देशात व राज्यात मानसिक गुलामगिरी स्वीकारली गेली. केंद्र व राज्यातील सरकारला शेतकर्यांचे दुःख माहिती नाही. अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे देशात मंदी आहे. त्यामुळे देश चालवता येत नाही.
ते म्हणाले, आपले राज्य पुन्हा पेशवाईच्या हातात गेल्यास स्वातंत्र्यापूर्वीची वर्णाश्रम व्यवस्था यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने मतदान करा. अनेकांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे सत्ताधार्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीला ही मंडळी बळी पडली. त्यांचा विचार करू नका. आपण आपले भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला साथ द्या. यावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, पैलवान नानासाहेब पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, उदय पाटील-उंडाळकर, पैलवान तानाजी चवरे, सर्जेराव शिंदे, कृष्णत थोरात यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |