सातारा : वाढे फाटा येथील चायनीज गाड्यावर लॉलीपॉप खाल्ल्यानंतर त्याचे ज्यादा पैसे का लावले? असे विचारल्याचा कारणातून दोन गटात तुफान राडा झाला. अनोळखी 7 ते 8 युवकांनी अक्षरश: धिंगाणा घालत तलवार, कोयत्याने वार करत दांडक्याने ताणून मारहाण केली. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
पारस जालिंदर बनसोडे (वय 21, रा.कूपर कॉलनी, रामकुंड) या युवकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार पारस बनसोडे हा त्याचे मित्र शंतनु शिंदे, हणमंत भोसले यांच्यासोबत दि. 14 रोजी रात्री 9 वाजता दुचाकीवरुन वाढे फाटा येथे गेला होता. वाढे फाट्यावरील श्रीकृष्ण चायनीज गाड्यावर थांबून लॉलीपॉप फुलची माहिती घेतली असता चायनीजवाल्याने 120 रुपये सांगितले. त्यानुसार तक्रारदार पारस याने दोन लॉलीपॉप प्लेट पार्सलसाठी ऑर्डर केल्या. तोपर्यंत 30 रुपयांचे शिल्ललक असलेले चायनीज खाण्यासाठी मागितले.
लॉलीपॉप तयार झाल्यानंतर व चायनीज खावून झाल्याने त्यावरील गाडा चालकाने एकूण 300 रुपये सांगितले. बिलाची रक्कम जास्त होत असल्याचे तक्रारदार पारस याने चायनीज गाडा चालकाला तसे सांगितले. यावेळी तेथील स्वीट मार्ट दुकानात असलेला युवक आला व त्याने तक्रारदाराला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका कारमधून काही युवक आले व त्यांनीही तक्रारदारासह त्याच्या मित्रांना मारहाण केली. तक्रारदार युवकाने त्याच्या इतर मित्रांना या घटनेची माहिती देवून मदतीसाठी त्यांना येण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार याचे तीन मित्र वाढे फाट्यावर पोहचले. तोपर्यंत कारमधून आलेले युवक तेथून पसार झाले होते.
हाणामारीचा प्रकार थांबल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी रक्कम जास्त होत असल्याचे चायनीज गाडा चालकाला तक्रारदार व त्याचे युवक समजावून सांगू लागले. यावेळी आय ट्वेंटी कार, जिप्सी व आणखी एक कार आली व त्यातून 7 ते 8 जण खाली उतरले. संबंधितांनी तक्रारदारासह त्याच्या इतर मित्रांवर तलवारी, कोयत्याने हल्ला चढवला. तक्रारदार युवकाचे मित्र पळून जात असताना त्यांना ताणून मारहाण करत वार करण्यात आले. या सर्व घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोर पळून गेल्यानंतर जखमींना तत्काळ सिव्हील व पुढे नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जखमींची पाहणी करुन तक्रार नोंद करून घेतली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |