02:24am | Nov 19, 2019 |
कराड : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी प्रा.एन.डी.पाटील यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी दि.25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील सगाम महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम 2 लाख, मानपत्र असे आहे. तसेच यावेळी राजहंस प्रकाशन निर्मित राम खांडेकर लिखित सत्येच्या पडछायेत या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कराड केंद्राचे अध्यक्ष आ.बाळासाहेब पाटील यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (सोमवारी) बोलत होते. यावेळी मुंबई प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताबाळ सराफ, कराड केंद्राचे सचिव मोहनराव डकरे, प्रा.पोळ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
आ.पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृतिक कला क्रिडा या क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणार्या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्यावतीने सन 1990 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सन. 2019 चा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. एन.डी.पाटील यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दि.25 रोजी कराड येथील सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. या कार्यक्रमास राम खांडेकर, न्या.वाय.व्ही.चंद्रचुड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |