सातारा : चार भिंतीकडे जाणार्या रस्त्यावरील एका मठामध्ये गांजा ओढत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी धाड टाकून 10 संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, संशयितांमध्ये एकजण ‘पोलिस बॉय’ असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विकास गवळी, संजय लोखंडे, अंकुश शेलार, जयंत पवार, गजानन आवळे, अक्षय कांदेकर, महेश पवार, रोहित खंडजोडे, रवीद्र पाटोळे, सनी कांबळे (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी शहरानजीक एका मठामध्ये गांजा ओढत असणारी टोळी बसली असल्याची माहिती शहर पोलिसांनी समजली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे एक पथक तयार करुन एक वाजण्याच्या सुमारास मठामध्ये धाड टाकण्यात आली. पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती समजताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अखेेर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर परिसराची झडती घेण्यात आली.
पोलिसांना घटनास्थळावरुन गांजा, चिलीम व इतर साहित्य आढळून आले असून ते जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व संशयितांना पोलिस व्हॅनमध्ये घातले. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात बघ्यांची अक्षरश: गर्दी उसळली होती. पोलिसांनी सर्व संशयितांना शहर पोलिस ठाण्यात आणले यावेळी संशयितांमधील एक युवक पोलिसाचा मुलगा असल्याचे धक्कादायकरित्या समोर आले.
संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असून पोलिस अहवालाची प्रतीक्षा करत होते. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू शेख, पोलिस हवालदार निलेश गायकवाड, समीर कर्णे, सुशील भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |