सातारा : फलटण येथे दि. 16 मे रोजी मुंबई येथील पशू कल्याण कमिटीचे ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर यतीन जैन व परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी मंगळवार पेठेत असणार्या अवैध पशू वध गृहावर (कत्तलखाना) छापा टाकून काही टनांमध्ये गोवंशाचे मांस व 30 पेक्षा जास्त गोवंश प्रजातीची जनावरे ताब्यात घेतली होती. याठिकाणी रोज शेकडो गोवंशाची कत्तल केली जात असल्याबाबतचे पुरावे पोलिसांना घटनास्थळावरुन मिळाले होते. मात्र, या घटनेला पंधरा दिवस उलटूनही पोलिसांनी या प्रकरणात अधिक खोलात जावून तपास केलेला नाही. त्यामुळे गोवंश बचाव कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकूनही फलटण तालुक्यात ‘चोरी-छुपे’ गोवंशाची कत्तल होत असल्याची खात्रीलायक बातमी ‘सातारा टुडे’ला मिळाली आहे.
या सर्व रॅकेटमध्ये मुंबई येथील बीफ माफिया सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या बिफ माफियांचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी निकटचे संबंध आहेत. संबंधित बिफ माफिया मुंब्रा, नागपाडा, डोंगरी या भागात बसून आंतरराष्ट्रीय बिफ रॅकेट चालवित आहेत. 2015 साली महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा पारित केला. त्यामुळे गोवंशातील सर्वच जनावरांची कत्तल बंद झाली. फक्त म्हैसीच्या कत्तलीला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई व आखाती देशातील खवैय्यांना म्हैसीचे मांस रुचत नाही. यासाठी या भागातून भारतीय देशी गायींच्या मांसाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या बिफ व्यापाराच्या माध्यमातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व पर्यायाने आयएसआय संघटना दररोज अरबो रुपयांचा व्यवसाय करीत असतात. हाच पैसा शेवटी भारतामध्ये देशविघातक कारवाया करण्यासाठी वापरला जातो. मात्र, फलटण येथील गुडघ्यात मेंदू असलेल्या कत्तलखान्यातील भागीदार असणार्या पुढार्यांना या गोष्टी माहिती असूनसुद्धा पैशाच्या हव्यासापोटी याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे फलटण तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील फलटण व कराड तालुक्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून नगरपालिकांच्या मालकीचे कत्तलखाने (पशू वध गृह) अस्तित्वात आहेत. याठिकाणी यापूर्वी देशी गायी, बैल, जरसी, हॉस्टन (अंतुल्या) या प्राण्यांची सर्रास कत्तल केली जात होती. याबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याने भाकड जनावरे शेतकरी कसायांना कवडीमोल किंमतीमध्ये विकली जात होती. मात्र हेच जनावरांचे मांस परदेशांमधील मुख्यत्वे आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जात होते. त्यामुळे यामधून मुंबई, कराड, फलटण येथील बिफ माफियांना महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत होते. गाय ही कल्पवृक्षाप्रमाणे आहे. गायीचे मांस, गायीची कातडी, गायीची हाडे या अवयवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे एक गायीपासून सरासरी 80 ते 90 हजार रुपये संबंधित बिफ माफियांना मिळत असतात.
नव्वदच्या दशकामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आखाती देशांमध्ये पळाल्यानंतर मुंबईमधील बिफ माफियांनी दाऊद इब्राहिमला मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला होता. खंडणी आणि बॉलिवूडमधूनही जेवढा पैसा मिळत नव्हता, एवढा पैसा दाऊदला मुंबईमधील या बिफ माफियांकडून मिळत असल्यामुळे दाऊदने दुबईमध्ये राहून बिफ इम्पोर्ट ही कंपनी सुरु केली होती. कालांतराने दाऊद इब्राहिमने भारतातील संपूर्ण बिफ व्यवसाय काबिज केला. गेली काही वर्षे सर्व काही सुरळीत चालू असतानाच देशात आणि राज्यात 2014 साली सत्तांतर झाल्यानंतर लोकांच्या आग्रहाखातर राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गोवंश प्रतिबंधक कायदा पारित करुन खर्याअर्थाने बिफ माफियांचे कंबरडे मोडले. त्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यातीसाठी गायीचे मांस मिळत होते, तेवढे मांस 2015 नंतर कमी पडू लागले. साहजिकच यामुळे गायीच्या मांसाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या.
त्यामुळे मुंबई येथील बिफ माफियांनी बारामती व फलटण येथील शासनमान्य खाजगी कत्तलखान्यांकडे लक्ष घातले. मुंबईमधील राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याने याबाबत फलटण नरेशांना साकडे घातले व मोठ्या प्रमाणावर गायीचे मांस पुरविण्याची विनंती केली. यानंतर फलटण नरेशांनीही लक्ष्मीची पूजा करीत सगळ्या शासकीय यंत्रणा दावणीला बांधल्या. यानंतर बंदी असूनही फलटण तालुक्यातून रोज टनांमध्ये गायीचे मांस एक्सपोर्ट करण्यासाठी मुंबई येथे जावू लागले. मंगळवार पेठ येथील नगरपालिकेच्या कत्तलखान्यात गोवंशाची कत्तल करायची. त्यानंतर हेच मांस अलगुडेवाडी, ता. फलटण येथील खाजगी शासनमान्य कत्तलखान्यात पाठवायचे. तिथे हे मांस स्वच्छ करुन सॉर्टिंग केले जाते. यानंतर मोठमोठ्या फ्रिझरमध्ये हे मांस गोठवून एक्सपोर्टसाठी मुंबई येथील बीपीटी व जे एन पी टी या पोर्टवर रोजच्या रोज पाठविले जाते. यामधून मुंबईमधील बिफ माफियांना कोट्यवधी रुपये मिळतात. तसेच यामधून मिळालेला नफा फलटण नरेशांना व त्यांच्या भागिदारांना विनासायास दर महिन्याला मिळत असतो.
काहीही न करता फलटण नरेशांना महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत असल्यामुळे फलटणमधील गोवंश सहाराचा कार्यक्रम शासकीय इतमामात सुरु आहे. मात्र, पैशाच्या हव्यासापोटी आपण देशाशी गद्दारी करतोय, याचे भान फलटण नरेशांसह त्यांच्या पिलावळींना आजपावेतो आलेले नाही. पोलिसांनी 16 मे रोजी या प्रकरणी कारवाई केली. मात्र याचा तपास अद्याप जैसे थे च आहे. या संदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने अहवालही मुख्य कार्यालयास पाठविलेला असल्याचीही माहिती पुढे येत आहे. मात्र देश विघातक कारवायांमध्ये सहभागी असणार्या दाऊद इब्राहिम व पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला अजाणतेपणी मदत करणार्या फलटण नरेश व त्यांच्या पिलावळींवर येणार्या काळामध्ये काय कारवाई होतेय, या संदर्भात सातारा पोलिसांनी आता लक्ष घालायला हवे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी फलटण येथील अवैध बिफ तस्करी प्रकरणी आवाज उठवायला हवा. अन्यथा आपल्याच पैशातून दाऊद इब्राहिम व आयएसआय देशामध्ये 26/11 प्रमाणे हल्ला घडवू शकते. याचे भान आतातरी संबंधितांना यायला हवे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |