कराड : येथील भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या खिशातील मोबाईल आणि काही महिलांच्या पर्स लंपास करण्यात आल्याची घटना आज रविवारी सायंकाळी घडली. भाजी मंडईतील गर्दीचा आणि पोलिस नसल्याचा फायदा उठवत चोरट्यानी आज चांगला डल्ला मारुन मोबाईल, रोख रक्कम आणि काहींची महत्वाची कागदपत्रेही लंपास केली.
कराडचा आज आठवडा बाजारचा दिवस असतो. त्यामुळे मंडईत भाजी विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचीही मोठी गर्दी असते. भाजीमंडई सध्या मुळ मंडईच्या जागेसह प्रभात थिएटरसमोरही भरु लागली आहे. आज सायंकाळी बाजारात मोठी गर्दी होती. त्या गर्दीचा फायदा उठवत काही चोरट्यांनी महिलेची पैसे, मोबाईल, महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स, काहींचे मोबाईल आणि काहींचे पैसे लंपास केले. मंडईतील एकाच ठिकाणावरुन अनेकांचे मोबाईल आणि महिलेची पर्स लंपास झाली आहे. सायंकाळी त्यांनी तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी तेथे चार ते पाच जणांचे मोबाईल, एका महिलेची पर्स, महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम लंपास झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत तक्रार देण्याचे काम शहर पोलिस ठाण्यात सुरु होते. पोलिस निवडणुक कामात गुंतल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी आज मोबाईल आणि रोख रकमेवर हात मारला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |