RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

भारत महिला हॉकी संघाचा १६-० ने विजय

11 October 2018 at 18:24

ब्यूनॉस आयर्स :  भारताच्या अंडर 18 महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील आपल्या तिसर्‍या सामन्यात वनातू या नवख्या संघाला तब्बल 16-0 अशा गोलफरकाने एकतर्फी चिरडले. 

भारतीय मुलींनी या सामन्यात सुरुवातीपासून ते अखेरच्या मिनिटापर्यंत आपले वर्चस्व कायम राखले होते. फॉरवर्ड मुमताज खानने आठव्या, 11, 12  आणि 15 व्या मिनिटाला असे चार गोल केले. तर, चेतनाने 6, 14 आणि 17 व्या मिनिटाला गोल केले. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या लालरेमसियामीने सामन्याच्या दुसर्‍या मिनिटात गोल करून भारताला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या 30 सेकंदांनी रितने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर कर्णधार सलिमा टेटेने आणखी एक गोल करत संघाची आघाडी 3-0 अशी आणखी भक्‍कम केली. 

बलजितने पाचव्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल करून संघाची आघाडी 5-0 वर पोहोचवली. त्यानंतर चेतना व रितने सहाव्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. पूर्वार्धात मुमताजने आठव्या, तर लालरेमसियामीने 10 व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी 9-0 अशी आणखी भक्‍कम केली. 

दुसर्‍या हाफमध्येही वनातूचा संघ भारतीय आक्रमणापुढे हतबल झाला. या हाफच्या पाच मिनिटांत मुमताजने तीन गोल नोंदविले. सलिमाने 13 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. चेतनाने 15 व्या मिनिटाला आपला तिसरा व भारताचा 15 वा गोल नोंदविला. त्यानंतर इशिका चौधरीने शेवटच्या मिनिटात गोल करून भारताला वनातूवर 16-0 ने विजय मिळवून दिला. गोलकीपर वगळता भारताच्या सर्व खेळाडूंनी गोल केले.