सातारा : दीपक पवारांच्या सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे कार्यालय पोलीस मैदानाशेजारी ना. चंद्रकांत दादा पाटील, ना. शेखर चरेगावकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. यावेळी विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, महेश शिंदे आणि जिल्हातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. दीपक पवारांना येणाऱ्या काळात करावयाच्या कामाची दिशा सांगत पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभा तर सप्टेंबर अखेर विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकीत ना. पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले, भाजपाच्या आग्रहाप्रमाणे निवडणुकांच्या कामाला दीपक पवार लागले असले तरी राष्ट्रवादीचा उमेदवार बलाढ्य आहे. त्यामुळे नावाला पक्ष कार्यालय उघडले आणि लोकांचे प्रश्न सोडवायला कोणी नाही, असे व्हायला नको.
शिवेन्द्रराजेंच्या विरोधात लढताना २०१४ साली दीपक पवारांना चांगली मते पडली आहेत. त्यावेळी भाजपाकडे सत्ता नसताना हे घडले. आता भाजपा सत्तेत आहे, त्यामुळे आता पवारांना चांगली संधी आहे. लोकांची कामे करताना कार्यालयात तज्ञ माणसे ठेवा, आपुलकीने बोला. पक्ष हवी ती मदत करेल. यावेळी कोल्हापुरात जनसंवाद साधताना राबवत असलेल्या काही निवडक उपक्रमांची माहिती दादांनी दिली. प्रास्ताविक दीपक पवारांनी केले. कार्यक्रम आटोपल्यानंतर दादांना पत्रकारांनी मेडीकल कॉलेजबाबत छेडले असता या विषयावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे दादांनी सांगितले.
सातारा पालिका गटनेत्याचा सत्कार
सातारा नगरपरिषदेत काही दिवसांपूर्वी झालेले तांडव मिटले असले तरी नवनियुक्त गटनेते मिलिंद काकडे आणि स्वीकृत सदस्य सागर पावशे, वृक्ष कमिटीचे धनंजय पाटील यांचा सत्कार ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहकारी नगरसेवक उपस्थित होते.
साताऱ्यात कोल्हापुरी भारुड...
कार्यालयाचे उदघाटन झाल्यानंतर बोलताना ना. पाटील हे कोल्हापुरातील कामाचे किस्से सांगत असल्याने पालकमंत्री ना. शिवतारे ज्याप्रमाणे वारंवार पुरंदर पुराण सांगतात. त्याचप्रमाणे दादा कोल्हापूर भारुड सांगत असल्याने विशेष काही सातारकरांच्या हातात मिळाले नाही.
अमित कदमांची सत्काराकडे पाठ
भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी जावळीतील भाजपा नेते अमित कदम यांची वर्णी लागल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, नाव पुकारले तरी सत्कार स्वीकारायला कदम आलेच नाहीत. त्यामुळे उमेदवारीचा पेच सुरुवातीलाच निर्माण झाला आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |