Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001
contact@tmnnews.com
02162 237 474
सातारा : एखादया महत्वाच्या तक्रारींचा तपास करताना आरोपीला मदत करण्याचे सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून एका दाखल गुन्ह्यात तपासकामी कुचराई केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे यांना दंडाची शिक्षा झाली. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे तपास आधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणून गेले आहेत.
सातारा शहरातील शिवकृपा सहकारी पतपेढीच्या संचालकांविरोधी तक्रारदार शिवाजी सावंत यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारी संदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.नि. पोरे यांच्याकडे तपासाचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी तक्रारदार यांनाच आरोपीसारखी वागणूक दिली तसेच योग्य तपास न करता खऱ्या आरोपींना पाठीशी घालून त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. याबाबत आरोपींना जाणीवपूर्वक तपास अधिकारी स पो नि श्रीकृष्ण पोरे यांनी सहकार्य केल्याची लेखी तक्रार शिवाजी सावंत यांनी सातारा जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख याच्यांकडे केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते.
त्यानुसार तपास अधिकारी पोरे यांच्याकडून आरोपींना कायदेशीर कारवाई होऊ नये . आरोपीला अटक करण्यात टाळाटाळ केली जात होती. तक्रारदाराला खोटे ठरविण्यात येत असल्याची बाब तपास अधिकारी पोरे यांच्याकडून झाली असल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक पोरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे सिध्द झाले. याप्रकरणी स पो नि श्रीकृष्ण पोरे यांना दोन हजार रुपयांचा दंड जिल्हा पोलिस प्रमुखांनी ठोठावला. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यावरील कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सातार्यातील ही पहिलीच कारवाई असून काही अधिकारी रडारवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे
सातारा जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यात यापूर्वी तपास आधिकाऱ्यांविरोधी अनेक गुन्ह्यात आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत तक्रारी सुद्धा करण्यात आली होती. पण, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात तपास अधिकारी हेच संमातर न्यायालयाचे काम करीत होते. असा अनेकांनी अनुभव घेतला आहे. आता,पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपास आधिकाऱ्यांची निःपक्षपाती पणे चौकशी करून सत्य परिस्थिती लक्षात घेऊन स पो नि पोरे यांच्यावर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून पोलीस यंत्रणेबद्दल विश्वासाचे नाते निर्माण करण्यास मदत केली आहे.त्याबद्दल सातारा जिल्हात देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच तक्रारदार शिवाजी सावंत यांचे कौतुक होत आहे.
काय आहेत पोरे यांच्यावरील आरोप ?
शिवकृपा पतपेढीच्या संचालक मंडळाला दर मंगळवारी व शुक्रवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर शिवाजी सावंत तक्रारदार असलेल्या एका प्रकरणात सातारा येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. परंतु त्याचे तपास अधिकारी पोरे यांच्या मदतीने संचालक यांनी पालन केले नाही. सदर माहिती तपासी अधिकारी पोरे यानी न्यायालयापासुन दडवली. व केवळ कागदोपत्री दिखावा करुन आरोपींना वाचविण्यासाठी सहकार्य केले.असे सावंत यांचे लेखी तक्रारीत आरोप केले होते. ते सिद्ध करून दिले.
कारंडवाडी ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील उघड्या खिडकीतून आकडा टाकून पर्स लांबवली. या पर्समध्ये सोन्याचे गंठण होते.
पानपट्टीची उधारी मागितल्याने चिडून जावून पानटपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली डोक्यात फोडून मारहाण करण्यात आली. ही घटना एमआयडीसी येथे घडली असून याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सौ.धनश्री उमेश टकले (वय 41, रा.रविवार पेठ, सातारा) या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती उमेश दत्तात्रय टकले व सासू विमल दत्तात्रय टकले (दोघे रा.शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुशांत अणवेकर यांनी दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरुन ट्रान्स सह्याद्री ही 3 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर प्रवासाची मोहिम हाती घेतली असून त्यांची ही सायकल मोहिम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्र