05:01pm | Dec 17, 2019 |
लाहोर : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयानं आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगानं येऊन पाहावं, असं ते म्हणाले होते.
मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लादली होती. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानमधील तत्कालीन मुस्लीम लीग नवाज सरकारनं ही कारवाई केली होती. २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. त्यानंतर ३१ मार्च २०१४मध्ये मुशर्रफ यांना आरोपी घोषित करण्यात आलं आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात साक्षी नोंदवल्या गेल्या.
मुशर्रफ यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल १७ डिसेंबरला दिला जाईल, असं तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं याआधी सांगितलं होतं. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयानं २८ नोव्हेंबरला मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारकडून दाखल याचिकांवरील सुनावणीवेळी विशेष न्यायालयाला निकाल सुनावण्यापासून रोखले होते.
मुशर्रफ यांनी व्हिडिओद्वारे दिला होता 'हा' संदेश
गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयानं ७६ वर्षीय मुशर्रफ यांना या प्रकरणी जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दुबईत वास्तव्यास असलेल्या मुशर्रफ यांनी व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिलं होतं. 'मी खूपच आजारी असून, देशात येऊन जबाब नोंदवणं शक्य नाही,' असं ते म्हणाले होते. यासंबंधी पाकिस्तानी माध्यमांनीही वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मुशर्रफ यांना दुर्मिळ आजार असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं या वृत्तात म्हटलं होतं. मुशर्रफ यांनी देशद्रोहाचे आरोप फेटाळले होते. मी नेहमीच या देशाची सेवा केली आहे. देशाशी गद्दारी केल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. दहा वर्षे मी देशाची सेवा केली. त्यामुळं माझ्यावर देशद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |