11:18pm | Nov 02, 2018 |
वाई : वाङ्मयीन प्रवाहातील बदलाची मी केवळ निमित्त असून साहित्याचे निर्मळ प्रतिबिंब बिनविरोध निवडीमुळे वाचकांना पाहता येईल, असे प्रतिपादन नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर होते. मराठी भाषा विभागाच्या सहसचिव श्रीमती अपर्णा गावडे, अव्वर सचिव हर्षवर्धन जाधव, कक्ष अधिकारी विनय भोसले, वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, विश्वकोश मंडळाचे सचिव श्री. शामकांत देवरे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, श्री. सतिश शेंडे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. ढेरे म्हणाल्या, साहित्यिक परंपरेची एक पाईक म्हणून मी कार्यरत राहिन. सध्याचे संमेलन यवतमाळ म्हणजे विदर्भात होत असल्याने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता साधेपणाने संमेलन करण्याचा प्रयत्न असेल. संमेलन अध्यक्ष निवडीतील बदल हा स्वागतार्ह असून हीच परंपरा आधी असती तर अनेक थोर साहित्यिकांनाही संधी मिळाली असती, असे सांगून त्या म्हणाल्या, त्या सर्व थोर साहित्यिकांचा विनम्र आदर करत मी हे पद स्वीकारले आहे. बदलाच्या या काळात संमेलनाचे स्वरूप ही बदलले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विश्वकोश मंडळासह वाईतील विविध संस्थांच्या वतीने डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष दिलीप करंबेळकर, सहसचिव अपर्णा गावडे, सचिव शामकांत देवरे, नगराध्यक्षा प्रतिमा शिंदे, विद्याव्यासंगी सहायक डॉ. जगतानंद भटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्याव्यासंगी सहायक आनंद गेडाम, सरोजकुमार मिठारी, संतोष गेडाम, रवींद्र घोडराज,उमाकांत खामकर, संपादकीय सहायक पल्लवी गायकवाड, शिल्पा भारस्कर, मनोज जोशी, मनोज गजभिये, सचिन भाडळकर, विनोदिनी निर्गुण, वर्षा नाईक आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. श्री. शामकांत देवरे यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन जगतानंद भटकर यांनी केले. वर्षा देवरुखकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी मराठी विश्वकोश मंडळासह वाई नगरपालिका, प्राज्ञपाठशाळा, रोटरी क्लब, उत्कर्ष पतसंस्था, वाई मेडिकल असोसिएशन, संस्कार भारती, लोकमान्य टिळक स्मारक संस्था, सहकार भारती, कन्या शाळा, द्रविड हायस्कूल, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, बापूसो शिंदे विद्यालय, कृष्णाबाई संस्थान घाट, गोवर्धन संस्था, सावरकर प्रतिष्ठान, कृष्णाई कला मंच आदी संस्थांच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |