03:01pm | Jul 27, 2019 |
कल्याण : बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे वांगणी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकाजवळ अडकली आहे. जवळपास 700 प्रवासी यामध्ये अडकले आहेत. प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांपर्यंत मदतकार्य पोहचवण्यासाठी एअर फोर्सची दोन हेलिकॉप्टर्स पाहणी करण्यासाठी मुंबईतून रवाना होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
कल्याण, बदलापूर अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचलं आहे.
वांगणी येथे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. बदलापूर ते कर्जत, खोपोली दरम्यानची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
डोंबिवली परिसरात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वीज पुरवठा शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे.
काही प्रवाशी धाडस करून रेल्वेमधून उतरून रुळावर आले. या सात प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : सूमीत सायेकर (कोल्हापूर), मेहबूब तांबोळी (सोलापूर), आकाश राजेंद्र दुबळे (सातारा), गणेश मारुती पांडव (कोल्हापूर) विशाल मारुती पांडव (कोल्हापूर), संदीप निवृत्ती शिंदे (सातारा), सचिन प्रकाश राकडे (मुलूंड).
रेल्वेमध्ये अडकून पडलेल्या अन्य प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या ठिकाणी मदतकार्याचा वेग वाढवावा लागेल. मात्र या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिकांकडे कोणतेही साधन नसल्याने व पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांनी या ट्रेनमध्ये असलेल्या लोकांसाठी खाण्यापिण्याची सोय केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |