सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ काल दि. 10 रोजी संध्याकाळी फलटण येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सातारा टुडे’चा अंक अवलोकन करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. यावेळी ‘ह्यो बी मल्ल्या, त्यो बी मल्ल्या’ ही भानगड विचारली असता रणजितसिंहांनी ‘ही भानगड’ फलटण नरेशांची आहे. रणजितसिंहांची खोचक टिप्पणी व फलटण नरेशांचे ‘ते’ अर्कचित्र पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरता आले नाही आणि ते खुदकन हसले.
माढा लोकसभेसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रचारसभांना धार येवू लागली आहे. आज महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथील मोती चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार नारायण पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. बाबुराव माने, माजी आ. दिलीप येळगांवकर, दिगंबर आगवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, उत्तमराव जानकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, सह्याद्री कदम, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फलटण नरेशांनी गेल्या वीस वर्षामध्ये सातारा टुडे मध्ये प्रसिद्ध झालेल्या फलटण नरेशांच्या भानगडींचा लेखाजोखा असलेला ‘सातारा टुडे’चा अंक सभामंचकावरील मान्यवरांच्या हातात दिला. प्रथमदर्शनी ही काय भानगड आहे, हे कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र ‘सातारा टुडे’च्या मुखपृष्ठावरील अर्कचित्र पाहून आपले हसु आवरता आले नाही. परंतू जसजसा अंक वाचायला सुरुवात केल्यानंतर तसतसा फलटण नरेशांचे खरे रुप मान्यवरांच्या लक्षात आले. आतापर्यंत असे सडेतोड लिखाण कोणी केलेच नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर फलटण नरेशांच्या भानगडी वाचून डोक्याला हात लावला. ‘सातारा टुडे’च्या अंकाचे पुन्हा एकदा अवलोकन करावे लागेल. जेणेकरुन फलटण नरेशांचे आणि त्यांच्या दोन्ही दाढीवाल्या बंधूंचे खरे रुप मला समजून घेता येईल, असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कानात सांगितले. ‘सातारा टुडे’ने फलटण तालुक्यात सुरु असलेल्या बेबंदशाहीच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. फलटण तालुक्यात फलटण नरेशांनी व त्यांच्या बंधूंनी कशा पद्धतीने सामान्यजनांचे शोषण करुन राजकारण केले, याचा लेखाजोखा ‘सातारा टुडे’ने ‘ह्यो बी मल्ल्या, त्यो बी मल्ल्या शेवटी आमचाच झाला बल्ल्या’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करुन फलटण नरेशांच्या भानगडी चव्हाट्यावर आणल्या आहेत. आज भाजपा कार्यकर्त्यांनी मुद्दाम ‘सातारा टुडे’चे अंक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला. परंतू मुखपृष्ठावरील अर्कचित्र पाहुनच मुख्यमंत्र्यांना आपले हसू लपवता आले नाही. मुख्यमंत्र्यांनी फलटण नरेशांच्या भानगडी वाचल्यानंतर ते गंभीर झाले. पुन्हा एकदा ‘सातारा टुडे’च्या अंकाचे मला अवलोकन करावे लागेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सातारा टुडे चे दोन अंक स्वत:जवळ ठेवले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |