02:02am | Nov 25, 2018 |
सातारा : कराड येथे पक्षी अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करु त्यासाठी लागणारी जमिन आणि इतर बाबीसाठी पक्षीमित्र संघटनेनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कराड येथे पक्षी मित्र संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना संयोजित पक्षीमित्र संमेलनाचा समारोप व पक्षी मित्र पुरस्कार वितरण सोहळा महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते. या समारोप सोहळ्याला सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे, पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष किशोर रिठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष रोहन भाटे, कार्यवाह जयंत वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षी संवर्धनाची चळवळ ही अभिनंदनीय बाब आहे. याचा फायदा संपूर्ण सजीव सृष्टीला निश्चितपणे होऊ शकतो. संमेलनामध्ये ठराव झालेल्या पक्षी अध्ययन उभारणीसाठी जागा मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करा , त्याकामी शासन मदत करेल.
कराड जिमखाना विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिला आहे. पक्षी अध्ययन केंद्राची जबाबदारी कराड जिमखान्याने उचलावी राज्य सरकारच्या माध्यमातून चंद्रकांतदादांच्या व शेखरदादांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी दिली.
यावेळी किशोर रिठे यांनी कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, पक्षांचे घटलेले आदिवासी क्षेत्र यामुळे पक्षी वैभवावर होणारे प्रतिकुल परिणाम व माळढोक, गिधाड, तृणमोर या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षांच्या प्रजाती याकडे चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष वेधून याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी पाटण तालुक्यातील वनसंवर्धनाच्या महत्त्वपूर्ण कामाबरोबरच पक्षी वैभव जोपासण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे निस्वार्थी काम करणाऱ्या वैभव दिलीपराव संकपाळ यांना पक्षीमित्र पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच संमेलनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने भरविण्यात आलेल्या विविध स्पर्धां व उपक्रमांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. सुधीर एकांडे यांनी प्रास्ताविक केले. जयंत वडतकर यांनीही मार्गदर्शन केले. सतीश उपवळेकर यांनी सूत्रसंचालन केले
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |