02:14am | Mar 06, 2020 |
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात अवघ्या 100 दिवसांत तब्बल 8,21,040 मेट्रीक टन इतके विक्रमी गाळप केले आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात सुरू असलेल्या नियोजनबद्ध कारभारामुळे हे विक्रमी गाळप करणे शक्य झाले असून, गाळपाचा प्रतिदिन वेग 115 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. तर सरासरी साखर उतारा 12.60 टक्के राहिलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे यंदा सर्वच साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. कृष्णा कारखान्याच्या गळीत हंगामास 26 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारंभ झाला. उशिरा हंगाम सुरू झाला असला तरी कारखाना प्रशासनाच्या तोडणीच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याकडे नियमितिपणे ऊसपुरवठा होत राहिला. तसेच चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या योग्य आखणीमुळे कारखाना प्रतिदिन पूर्ण क्षमतेने चालविण्यातही प्रशासनाला यश आले. याचीच परिणिती म्हणून यंदाच्या हंगामात जिल्ह्यात कृष्णा कारखाना गळीतासह सरासरी साखर उतार्यातही अव्वलस्थानी राहिला आहे.
कृष्णा कारखान्याचा हंगाम सुरू होऊन आज 100 दिवस पूर्ण झाले. या 100 दिवसांत कारखान्याने प्रतिदिन सरासरी सुमारे 8235 मेट्रीक टनाहून अधिक क्षमतेने एकूण 8 लाख 21 हजार 40 मे. टन इतके विक्रमी गाळप केले. तसेच आजअखेर 10 लाख 29 हजार 130 क्विंटल साखर पोती उत्पादित केली असून, सरासरी साखर उतारा 12.60 टक्के आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने यापूर्वीही विक्रमी गाळप केले आहे. गतवर्षी 18 मार्चला कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात 9100 मे. टन इतके विक्रमी गाळप करण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षांत कारखाना कामकाजात पारदर्शकता आणत, आर्थिक शिस्त लावली आहे. तसेच कारखान्याच्या शेतकी विभागाने नियोजनबद्ध तोडणी यंत्रणा राबविली आहे. यांत्रिकीकरणावर भर देत कारखान्याची तोडणी यंत्रणा हार्वेस्टर मशिनने सुसज्ज केल्याने, शेतकर्यांनाही वेळेत तोड मिळत आहे. या सर्व नियोजनामुळे विक्रमी गाळपाची परंपरा कृष्णा कारखान्याने कायम राखली असून, याबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |