12:06am | Jun 07, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बुधवारी जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्या बदल्यात चार नवे पोलिस निरीक्षक जिल्ह्याला मिळाले आहेत. कराड शहरचे दोन्ही पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच 8 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या असून त्याबदल्यात नवे 10 सपोनि जिल्ह्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोनि पद्माकर घनवट, महाबळेश्वरचे पोनि दत्तात्रय नाळे व मुख्यालयातील पोनि दत्तात्रय कुलथे यांना जिल्ह्यात आणखी एक वर्षाचा कालावधी वाढवून मिळाला आहे.
पोलिस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये कराड शहर पोलिस ठाण्याचे प्रमोद जाधव, पोनि राजेंद्रकुमार राजमाने, फलटण ग्रामीणचे पोनि अशोक शेळके व मुख्यालयातील पोनि संभाजी म्हेत्रे यांची बदली झालेली आहे. यातील बहुतांशी सर्वांचा जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झालेला आहे. नवीन आलेल्या पोलिस निरीक्षकांमध्ये सज्जन हंकारे, बंडोपंत कोंडुभेरी, विश्वास साळुंखे, अमरनाथ वाघमोडे यांचा समावेश आहेे. हे सर्व अधिकारी पुणे ग्रामीण, सोलापूर येथून आलेले आहेत.
पोलिस निरीक्षकांप्रमाणेच सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खंडाळा पोलिस ठाण्याचे सपोनि युवराज हांडे, रहिमतपूरचे सपोनि श्रीकृष्ण कानुगडे, वाठार पोलिस ठाण्याचे मयुर वैरागकर यांचा समावेश आहेे. सपोनिमध्ये एक वर्षाची वाढ मिळालेल्यामध्ये सपोनि वाचक शाखेच्या वृषाली पाटील, भुईंज पोलिस ठाण्याचे बाळू भरणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, पोनि दत्तात्रय नाळे व पोनि दत्तात्रय कुलथे यांचा जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झालेला आहे. मात्र त्यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |