कराड : सातारा,सांगली, सोलापूर जिल्हातील हजारो शेतकर्यांचे मागील गळीत हंगामातील ऊस बील केन अॅग्रो या कडेगाव तालुक्यातील साखर कारखान्याने थकविले आहेत. गेले आठ महिने झाले तरी हजारो शेतकर्यांना अजुन एकही रुपया मिळाला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर काही शेतकर्यांना पैसे मिळाले आहेत. दहा दिवसांपूर्वी स्वाभिमानी ने निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरूवारी हजारो शेतकर्यांच्या उपस्थित खा.राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली केन अॅग्रो येथे दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पैसे मिळाल्याशिवाय उठणार नसल्याच्या भूमिकेवर शेतकर्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम होती. यावेळी कारखाना प्रशासनाच्यावतीने तीन ते चार वेळा चर्चा करण्यात आल्या. परंतु शेतकरी आज पैसे घेतल्या शिवाय येथून जाणार नसल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात होता.
यानंतर कारखाण्याचे संचालक दत्ताशेठ सूर्यवंशी तसेच कडेगावचे नायब तहसीलदार यादव यांनी मध्यस्थी करुण पैसे उपलब्ध करण्यासाठी कारखान्याला थोड़ा वेळ द्यावा अशी विनंती केल्यानंतर सर्व शेतकर्यांच्या सहमतीने येत्या पंधरा तारखेपर्यंत बिल जमा न केल्यास जिल्ह्याधिकारी कार्यालय सांगली येथे तीव्र आंदोलन करुन कारखान्याचे चेअरमनचा पुतळा दहन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्यांच्या वतीने दिला.
यावेळी स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवड़े, स्वाभिमानी सांगलीचे उपाध्यक्ष पोपट पाटील, यूनुस पटेल, राजू माने, माजी सभापती नाना पुजारी, प्रमोद देवकर, सचिन कुदलें, प्रकाश माने, रमेश शिंदे, सरपंच विनोद देशमुख, नितिन माने, दत्ता संनगर, महेश निकम तसेच सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |