02:38am | Jun 05, 2018 |
वाई : पसरणी घाटात झालेल्या आनंद कांबळे खून प्रकरणातील निखील सुदाम मळेकर व दिक्षा आनंद कांबळे या दोन्ही संशयीत आरोपींना न्यायालयाने दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या खूनात मळेकरला मदत करणार्या अन्य साथिदारांविषयी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच त्यांना गजाआड करू अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि. 9) रोजी महाबळेश्वर फिरायला निघालेल्या आनंद कांबळे याचा त्याची पत्नी दिक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखील मळेकर यांनी कट रचून खून केला होता. या दिक्षाने या गुन्हयाची कबुली दिली होती. त्यानुसार पोलीसांनी मळेकर याला पुणे येथून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मळेकर याचे अन्य साथीदार फरार होते.
पोलीसांनी मळेकर व दिक्षा कांबळे यांना आज न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिल आर. पी. सोनावणे व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी संशयीत आरोपींनी पूर्वनियोजीत कट रचून आनंद कांबळे याला ठार मारले असून कट कोठे व कसा रचला, गुन्हयात वापरलेले हत्यार जप्त करावयाचे आहे. गुन्हयातील अन्य फरार साथीदार व दुचाकींचा शोध घेणे, सखोल चौकशी करणे, आदी कारणांसाठी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दिक्षा कांबळे व निखील मळेकर यांना न्यायालयाने दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान या गुन्हयातील फरार आरोपींबाबत महत्वाचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले असून त्यानुसार दोन पथके रवाना झाली आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |