सातारा : येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या तुळजाभवानी कॉम्प्लेक्स समोर ४ दिवस नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
याबाबत आंदोलकांनी दिलेली माहिती अशी की, तुळजाभवानी कॉम्प्लेक्स, साई हेरिटेज, साई प्रेस्टिज, गोल मारुती मंदिर परिसर बोकील बोळ, कोल्हटकर आळी या परिसराला नगरपालिकेच्या माध्यमातून पहाटे ५.१५ आणि ७.१५ अशा दोन घंटेवारीत पाणी सोडले जाते. मात्र गेल्या चार दिवसापासून या परिसरात पाणी न सोडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पाडव्याच्या सणाच्या दिवशीही येथील नागरिकांना पाण्याची उसनवार करावी लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक आणि महिलांनी आज सकाळी ८ ते ९ या वेळेत राजवाडा परिसरात असणाऱ्या तुळजाभवानी कॉम्प्लेक्स समोर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर तब्बल एक तासाने उशिरा पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याने समवेत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. श्रीकांत आंबेकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
निवेदनांना केराची टोपली
पाण्याची वानवा निर्माण झाल्याने नगरसेवक धनंजय जांभळे यांनी नगरपालिकाकडे वारंवार लेखी निवेदने देऊन आणि तोंडी तक्रारी करूनही या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली. परिणामी नगरपालिका पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहून आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यामुळेच नगरपालिकेच्या विरोधात तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |