RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

लाच स्विकारुन पळून जाणार्‍या उप निरीक्षकाकडून एसीबीच्या दोघांना चिरडण्याचा प्रयत्न

10 August 2018 at 19:09

दहिवडी येथील घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ

सातारा : बिअरबारचा परवाना रद्द करण्याचा रिपोर्ट सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात न पाठविण्यासाठी 13 हजारांची लाच मागणारा दहिवडी पोलीस स्टेशनचा उप निरीक्षक सतीश राजाराम दबडे (वय 55) याने मागणी केलेली 13 हजार रुपये रक्कम स्विकारुन संशय आल्याने वाहनासह पळून जात असताना त्याची कार अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या एसीबीच्या पथकावर गाडी घातली. यामध्ये एसीबीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे दहिवडी येथे बिअरबार व परमिट रुम आहे. या परमिट रुमबाबत तक्रारी असल्याने त्याचा परवाना रद्द करण्यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रिपोर्ट न पाठविण्यासाठी संबंधित पोलीस उप निरीक्षकाने तक्रारदार यास 13 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डिवायएसपी अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे आणि त्यांच्या पथकाने दहिवडी येथे सापळा रचला होता. ठरल्यानुसार पोलीस उप निरीक्षक सतीश दबडे हा लाचेची रक्कम घेण्यासाठी आला. 13 हजार रुपये ही लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर सतीश दबडे यास संशय आल्याने तो घटनास्थळावरुन  लाचेच्या रक्कमेसह चारचाकी वाहनातून पसार होत असताना त्याची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या एसीबीच्या दोन कर्मचार्‍यांच्या अंगावर उप निरीक्षक दबडे याने गाडी घातली. त्यामुळे एसीबीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दबडे याच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध युद्धपातळीवर घेत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्‌भावना दिन साजरा करण्यात आला.

11 hours before

कराडच्या मराठा रणरागिनींंचा आझाद मैदानावर ठिय्या ; २३ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनास प्रारंभ

मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागणी घेऊन कराडच्या मराठा रणरागिनींनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करत आहेत.

yesterday

कराड बसस्थानकाचे येत्या तीन महिन्यात उद्घाटन : ना. दिवाकर रावते यांची माहिती

दर दोन वर्षांनी बसस्थानक परिसरात करावे लागणारे डांबरीकरण, त्यावर येणार सातत्याचा खर्च, पडणारे खड्डे यावर कायम स्वरूपी पर्याय म्हणून राज्यातील सर्व बसस्थानक परिसरात काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

yesterday

बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी घेतला विकासकामांचा आढावा

नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह तब्बल बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.

yesterday