सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील आरळे व सोनगाव फाटा येथे मंगळवारीपासून सुरु झालेल्या अपघातांची मालिका बुधवारी दिवसभर सुरु होती. 14 तासात झालेल्या विविध तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आरळे येथे झालेल्या अपघातांमध्ये संतप्त जमावाने महिलेचा मृतदेह सातारा तालुका पोलिस ठाण्यात नेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, अपघातात ठार झालेल्यांमध्ये नैना रसाळ (रा.बोरखळ), विजय भोसले (रा.केसरकर पेठ) व प्राचार्य असिफ मणेर (रा.सातारा) अशी त्यांचे नावे आहेत.
आरळे (ता.सातारा) येथे ट्रक व दुचाकीचा मंगळवारी रात्री दहा वाजता झालेल्या भीषण अपघातात नैना विशाल रसाळ (वय 28, रा.बोरखळ, ता.सातारा) या ठार झाल्या. बोरखळ येथे नैना विशाल रसाळ या कुटुंबियासोबत राहण्यास असून सध्या त्यांच्या गावची यात्रा सुरु आहे. यात्रा असल्याने घरगुती कामानिमित्त मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्या पती विशाल यांच्या समवेत दुचाकीवरुन निघाल्या होत्या. आरळे येथील कै.डी.बी. कदम हॉलसमोरील रस्त्यावर एक ट्रॅक्टर बंद अवस्थेत उभा होता. या ट्रॅक्टरजवळ असतानाच पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या झालेल्या धडकेत नैना रसाळ गंभीर जखमी झाल्या व त्यातच ठार झाल्या.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यात्रेत असणार्या ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाकडे त्यांनी धाव घेतली. अपघात पाहिल्यानंतर जबाव संतप्त बनला व ग्रामस्थांनी नैना यांचा मृतदेह घेतला व थेट सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणला. अपघातप्रकरणी तत्काळ संशयितांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिस ठाण्यासमोर मृतदेह आणल्यानंतर पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर अपघातास कारणीभूत असणार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरणारा ट्रक, ट्रॅक्टर जप्त करत चालकांना ताब्यात घेतले. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा शहरातील गोडोली चौकालगत विजय सुधाकर भोसले (केसरकर पेठ) यांना बुधवारी सकाळी दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने ठोकरले. ते कूपर कंपनीमध्ये कामाला असून सकाळी त्यांची आठ वाजताची शिफ्ट होती. गोडोली नाक्यापासून पुढे गेल्यानंतर अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की विजय भोसले हे रस्त्याच्या बाजूला निपचीत पडले. एका एसटी चालकाला ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. भोसले यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हील व तेथून पुढील उपचारासाठी खासगी रुगणालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सोनगाव ता.सातारा गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात सातारा पॉलिटेक्निक सातारा कॉलेजचे प्राचार्य असिफ रसूल मणेर (रा.सातारा) हे जागीच ठार झाले. या अपघातात राहूल किसन कचरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघातात प्राचार्यांचा मृत्यू झाल्याने कॉलेजवर शोककळा पसरली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी दुपारी प्राचार्य असिफ मणेर हे दुचाकीवरुन निघाले होते. त्यांची दुचाकी सोनगाव गावच्या हद्दीत कुरणेश्वर घाटात आल्यानंतर याचवेळी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मदत करण्याचा प्रयत्न केला यावेळी मृत व्यक्ती प्राचार्य असल्याची माहिती समोर आली. कॉलेजमध्ये या घटनेची माहिती पसरल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घटनास्थळी व जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तालुका पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी उशीरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |