12:04am | Aug 26, 2018 |
सातारा : शिरवळ ता.खंडाळा येथील पळशी रोडवरील एका वाईन शाँप चालकावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात दोन जणांविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म अँकटखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलीसांनी व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शिरवळ ता.खंडाळा येथील पळशी रोडवर एक वाईन शाँप आहे. शुक्रवार दि.24 आँगष्ट रोजी वाईन शाँप चालक आकाश कबुले हे राञी 10 वाजण्याच्या सुमारास वाईन शाँप बंद करत आपले मिञ सनी टापरे ,जय मोरे व कामगार बाबू मोरे यांच्यासमवेत वाईन शाँपमधील शिल्लक स्टाँक व हिशोब करत बसले होते.यावेळी संपूर्ण हिशोब झाल्यानंतर मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान वाईन शाँपचे दुकानाचे शटर लावत असताना दुकाना शेजारी असणाऱ्या एका बेकरीसमोर एक दुचाकीवरुन दोन व्यक्ती आले.यावेळी दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने वाईन शाँपकडे असणाऱ्या आकाश कबुले यांच्या दिशेने अचानकपणे गोळीबार केला. यावेळी गोळीबारानंतर संबंधित गोळी ही शटरला लागली. गोळीबाराच्या आवाजानंतर आकाश कबुले व इतर हे सावध झाले तत्पूर्वी गोळीबार केलेले हल्लेखोर हे दुचाकीवरुन शिरवळ बाजूकडे पसार झाले.
दरम्यान,गोळीबाराची माहिती मिळताच सातारा पोलीस अधिक्षक डाँ.पंकज देशमुख,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी डाँ.अभिजीत पाटील,शिरवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल धुमाळ,पोलीस उपनिरीक्षक सुनिल पवार,सागर अरगडे यांनी कर्मचा-यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात हल्लेखोर हे फरार झाले. यावेळी पोलीसांचे पाच पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
गोळीबार हा कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या घटनेची फिर्याद आकाश कबुले यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून त्यानुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व आर्म अँकटखाली दोन अज्ञाताविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर करीत आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |