सातारा : कराड बसस्थानक परिसरातून सागर सदाशिव नलावडे (वय 20, रा.देशमुखमळा, पार्ले ता. कराड) या युवकाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने पिस्टल जप्त केले. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई झाल्यानंतर कराड परिसरात खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी, कराड बसस्थानक परिसरात एक युवक बेकायदा पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. कराड स्टँड परिसरात पोलीस गस्त घालत असताना एक युवक संशयितरीत्या फिरत होता. एलसीबीच्या पथकाने त्याला हटकताच तो पळून जाऊ लागला. एलसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले.
या घटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांनी संशयिताला नाव विचारल्यावर त्याने सागर नलावडे असे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पिस्टल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला कराड पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर संशयित युवकाकडे पोलीस रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करत होते.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलीस हवालदार प्रवीण फडतरे, शरद बेबले, निलेश काटकर, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, मयुर देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |