12:34am | May 23, 2018 |
सातारा : जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळावे व त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी शासनाची शाळेला मान्यता असणे आवश्यक आहे. मात्र सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनिधिकृत १६ शाळेमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये. प्रवेश घेतल्यास पाल्याच्या शैक्षणिक नुकसानीला पालक स्वताः जबाबदार राहतील, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कृष्णा पब्लिक स्कूल कराड, विध्यांगण एज्युग्राम कोरेगाव, अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल खंडाळा, सिनर्जी नॅचरल इंग्लिश मिडीयम स्कूल एम.आय.डी.सी सातारा, इंग्लिश मिडीयम स्कूल शिवथर, टेलेंट इंग्लिश मिडीयम स्कूल गोजेगाव, गुरुशिल्प सारखळ फाटा, शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल गाजवडी फाटा, सनशाईन इंग्लिश मिडीयम स्कूल वाई, नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल वाई, इंदिरा गांधी नॅशनल स्कूल वाई, नॅशनल पब्लिक स्कॉल वाई, के.एस मस्कर विद्या मस्करवाडी कसणी, होली किडस इंग्लिश मिडीयम स्कूल चाफळ, कल्याणी इंग्लिश मिडीयम स्कूल मल्हारपेठ, गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल केळघर या १६ शाळा अनाधिकृत आहेत.
आरटीईनुसार कोणतीही व्यक्ती, संस्था शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय शाळा स्थापन किंवा सुरु ठेवता येणार नाही. अशा शाळा सुरु राहिल्यास शाळेविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत शाळा बंद करावी लागेल अन्यथा शाळा सुरु ठेवल्यास १ लाख रुपये दंडाची कारवाई केली जाईल व यानंतरही शाळा सुरु ठेवल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंडाच्या वसुलीची कारवाई केली जाईल. पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून अनाधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेवू नये. जर प्रवेश घेतल्यास पाल्याच्या शैक्षणिक नुकसानीला पालक स्वताः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |