RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण ठार

11 June 2019 at 01:57

सातारा : रविवारी रात्री महामार्गावरील शेंद्रे ता.सातारा येथे साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात संजय वामन जाधव (वय 51, रा.भरतगाव ता.सातारा) हे ठार झाले. दरम्यान, महामार्गावर घडलेल्या या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

संजय जाधव हे सातारा एमआयडीसीमध्ये कामाला होते. रविवारी रात्री 12 वाजता काम संपल्यानंतर ते घरी निघाले होते. रविवारी सायंकाळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते हळूहळू जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाउस झाल्यानंतर ते नेहमी साचत असल्याने परिसरातील वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याबाबत तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

17 minutes before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

13 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

13 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

13 hours before