11:40pm | May 29, 2018 |
सातारा : साताऱ्यातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचा तिढा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुटल्यानंतर जिल्ह्यात आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. या लढाईमध्ये साताऱ्याचे पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही उडी घेतलेली आहे.
साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा खरंतर सातारकरांचा जिव्हाळ्याचा विषय, या विषयाच्या अजेंड्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. परंतु राज्यातील आणि केंद्रातील सत्तेत भागीदार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न सोडवता आला नाही. चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रद्द केल्यानंतर सातारा येथे नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला हिरवा कंदील मिळाला. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व श्रेय कांग्रेसला जाईल या भीतीमुळे जलसंपदा खाते ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीने शेवटपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मालकीची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळू दिली नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वादामध्ये सातारकरांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते व जिल्ह्यातील माध्यमांनी या विषयासंदर्भात अनेकदा आवाज उठवला मात्र कोडग्या झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने हा विषय सतत भिजत ठेवला.
देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा विषय मार्गी लागेल अशी अटकळ बांधली जात असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार पासून राज्य सरकारचे उंबरे झिजवले. नुकत्याच झालेल्या खा.उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहराची हद्दवाढ, किल्ले अजिंक्यतार्याचा संवर्धनासाठी 25 कोटीचा निधी व सातारा येथील शासकीय महाविद्यालयासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मालकीची पंचवीस एकर जमीन देण्याची घोषणा केली होती. केवळ दोनच महिन्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. शासकीय महाविद्यालयाच्या जमिनीचा तिढा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुटल्यानंतर, खासदार उदयनराजे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रक काढून आमच्याचं पाठपुराव्यामुळेच शासकीय महाविद्यालयाला जमीन दिल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर काही वेळातच जिल्हा माहिती कार्यालयाकडून "पालकमंत्र्यांनी सातारकरांना दिलेला शब्द खरा केला" 'पालकमंत्र्यांनी मांडले मुख्यमंत्र्यांचे आभार' अशा प्रकारचे वृत्त धाडण्यात आले. त्यामुळे सातारच्या शासकीय महाविद्यालयाच्या जमिनीसाठी लढले कोण? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
एरव्ही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदनासाठी सातारा येत असतात. स्वतःचा मतदारसंघ सोडला तर सातारा जिल्ह्याच्या विकासाशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. शासकीय कार्यक्रम सोडल्यास इतर वेळी ते जिल्ह्यात फिरकत नाहीत. असा आरोप विरोधकांनी वेळोवेळी पालकमंत्र्यांवर केलेला आहे. असे असताना मात्र श्रेयवादासाठी व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या उड्या पडत आहेत. त्यामुळे सातारा येथील शासकीय महाविद्यालयाच्या जमिनीसाठी प्रयत्न केले कुणी? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
प्रस्तावित मेडिकल कॉलेज उभारणीसाठी अजून दोन-तीन वर्षे लागणार आहेत, शासकीय महाविद्यालयाच्या जमिनीच्या कलगीतुरा भाजपा-शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात मात्र येणाऱ्या काळामध्ये जोरात रंगणार आहे. त्यामुळे सातारकरांचे मात्र मोठ्या प्रमाणावर मनोरंजन होणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |