03:30pm | Feb 08, 2020 |
मुंबई : दादर परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणार्या सहावीच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी बसचा क्लिनर काशिराम महादेव घाडीगावकर ऊर्फ काश्याला विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवून वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या पाच वर्षांपासून काशिराम हा जेलमध्ये आहे. पीडित मुलगी दादरच्या एका नामांकित शाळेत सहावीत शिकत होती.
पाच वर्षांपूर्वी तिच्यावर शाळेच्या क्लिनर काशिराम घाडीगावकर याने विनयभंग करुन लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर तिच्या पालकांना समजताच शाळेतील शिक्षक, पालक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. संतप्त झालेल्या पालकांनी शाळेत मोर्चा काढून दोषी आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.
या घटनेची दादर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध 376, 354 भादवी सहकलम 4, 8 पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच 15 मार्च 2015 रोजी याच गुन्ह्यांत काशिरामला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर गेल्या पाच वर्षांपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध नंतर विशेष सत्र न्यायालयात (पोक्सो) आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण होऊन न्या. बी. व्ही वाघ यांनी त्याला दोषी ठरविले. शुक्रवारी 7 फेब्रुवारीला न्यायमूर्तींनी त्याला वीस वर्षांचा कारावास, दोन हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर सावंत यांच्या पथकातील विजय कदम, पांडुरंग पाटील, गहीनीनाथ सातव, चौगुले यांनी केला तर कोर्ट कारकून म्हणून विजय काकड, महेंद्र बनसोडे यांनी काम केले तर सरकारी वकिल म्हणून गीता नायर यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली. त्यांच्याच युक्तीवाद आणि पोलिसांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्यामुळे आरोपीला शिक्षा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |