कराड : दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील 1 लाख 6 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना तारूख (ता. कराड) येथे रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सखाराम शंकर टेळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी हा ठाणे येथे वास्तव्यास असून त्याचे आई-वडील तारूख येथे राहतात. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास फिर्यादीचे वडील सखाराम टेळे हे लघुशंकेसाठी बाहेर गेले. त्यावेळी दरवाजा अर्धवट उघडा होता. त्याचा फायदा घेऊन दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील दागिन्याची पिशवी लंपास केली. कपाटाच्या आवाजाने फिर्यादीची आई गंगुबाई जाग्या झाल्या. त्यावेळी दोन जण घरातून बाहेर जाताना त्यांनी पाहिले. लाईट लावून पाहिले असता कपाटात दागिन्यांची पिशवी चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बाहेर जाऊन आरडाओरडा केल्याने शेजारचे लोक जागे झाले. मात्र, चोरटे दागिने घेऊन पळून गेले होते. फिर्यादीला चुलत भाऊ दाजीसाहेब बाबुराव टेळे यांनी मोबाईलवरून घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सोमवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दोन डोरली, नेकलेस, दोन चेन, सोन्याची लहान अंगठी, बदाम, असा मिळून 1 लाख 6 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |