03:02am | Oct 06, 2019 |
सातारा : देशात आणि राज्यात आरपीआयची भाजपासोबत युती असताना यापुर्वी जावली तालुक्यात मात्र आरपीआयला भारतीय जनता पार्टी विचारात घेत नव्हती आणि कोणत्याही समस्या सोडवत नाही म्हणून जावलीतील आंबेडकरी संघटना भाजपसोबत राहणार नसल्याचे मी जाहिर केले होते. मात्र आता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी आंबेडकरी जनतेच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. शिवेंद्रसिंंहराजे आरपीआयला सामावून घेवून आगामी काळात आंबेडकरी जनतेच्या समस्या निश्चित सोडवतील. त्यामुळेच आम्ही आमचा निर्णय मागे घेत असून जावलीतील आरपीआयसह सर्व आंबेडकरी संघटना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे एकदिलाने काम करणार असून शिवेंद्रसिंहराजेंना जावलीतून मताधिक्य देणार, असा शब्द रिपब्लीकरन पार्टी ऑङ्ग इंडियाचे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिला.
देशात आणि राज्यात आरपीआयची भाजपासोबत युती असताना यापुर्वी जावली तालुक्यात मात्र आरपीआयला भारतीय जनता पार्टी विचारात घेत नव्हती तसेच जिल्हा, तालुका पातळीवरील शासकीय कमिटीवर रिपार्ईंच्या पदाधिकार्यांची नियुक्ती, डॉ. बाबासाहेब स्मारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तालुक्यातील मागासवर्गीय युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, मेढा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे आदी मागण्या आणि समस्या सोडव्या जात नव्हत्या. त्यामुळे एकनाथ रोकडे यांनी काही दिवसांपुर्वी वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिध्द करुन जावली तालुक्यात रिपाईने भाजपला सोडचिठ्ठी दिल्याजे जाहिर केले होते. दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे हे जावली विधानसभेसाठी उमेदवार असल्याने मागण्या आणि समस्यांसंदर्भात रिपाईचे एकथान रोकडे, जिल्हा संघटक जयसिंग रोकडे, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष दशरथ कांबळे, नितीन जाधव, हेमंत गायकवाड, अनिकेत रोकडे, राहुल रोकडे आदींनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदी उपस्थित होते.
सविस्तर चर्चेनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांची पुर्तता आणि समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु. याशिवाय आम्ही कधीही जात- पात मानली नाही आणि तसा भेदभाव कधीही करणार नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजबांधवांच्या सर्वप्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्राधान्य देईन, असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले. तसेच शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे मागसवर्गीय जनतेचे सर्व प्रकारचे प्रश्न सुटतील अशी मला खात्री आहे. त्यामुळे यापुढे जावली आरपीआय भाजपच्या महायुतीसोबत राहणार असून जावलीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटना कामाला लागेल. आगामी काळात समाजातील लोकांचे आणि खास करुन महिला मेळावे आयोजित करणार तसेच शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ घर टू घर भेट देवून शिवेंद्रसिंहराजे यांना विक‘मी मतांनी विजयी करणार, असे एकनाथ रोकडे यांनी स्पष्ट केले आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |