12:01am | Aug 20, 2018 |
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने शिवसागर जलाशयात तब्बल 40 हजार 509 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि येणाऱ्या पाण्याची आवक पाहता पुन्हा कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे रविवारी सकाळी 4 फुटांवरून 5 फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत. त्यामुळे पायथा वीजगृहातून 2 हजार 100 आणि वक्र दरवाजातून 41 हजार 512 असे एकूण 43 हजार 612 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असल्यामुळे आणि कोयना धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे सातत्याने उचलून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात सध्याच्या घडीला 101.57 टीएमसी पाणीसाठा झाला असला तरी पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता आणि कोयना धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन कुठे तरी चुकते आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने कोयना धरण यावर्षी लवकर भरले. धरणात आवश्यक तेवढा पाणीसाठा झाला असला तरी अद्याप ऑगस्ट पूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडतो. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पावसाचे प्रमाण पाहता कोयना धरणात पाणी साठविण्याबाबत काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या कोयना धरण काटोकाट भरले असले तरी येत्या काही दिवसात पुन्हा धुव्वादार पावसाने सुरूवात केली तर भविष्यात कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागेल हे मात्र नक्की.
दरम्यान, शनिवार दि. 18 रोजी रात्रीपासून पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असलेने शिवसागर जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवरून चार फूट करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने रविवारी सकाळी सहा वाजता धरणाचे वक्र दरवाजे पुन्हा पाच फूट करून धरणातून प्रतिसेकंद 44 हजार 25 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कायेना नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होवू लागली असून कोयना नदीवरील मूळगाव पुलाला सध्या पुन्हा घासून पाणी चालले आहे. पावसाचा जोर वाढला तर पुन्हा धरणातून ज्यादा पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे.
रविवार दि. 19 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 27 (4603), नवजा 44 (4739), महाबळेश्वर 39 (4215) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जलपातळी 2160 फूट 8 इंच, 658.571 मीटर आणि धरणातील पाणीसाठा 101.57 टीएमसी इतका झाला आहे. सध्या धरणात 40 हजार 509 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे.
पावसाने चार हजारचा टप्पा ओलांडला
कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर या सर्वाधिक पर्जन्यमापन केंद्रावर साधारण जून ते सप्टेंबर या महिन्यात प्रतिवर्षी सरासरी 5 हजार मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होते. मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे 4 हजार 603, नवजा येथे 4 हजार 739 आणि महाबळेश्वर येथे 4 हजार 215 इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी पाणलोट क्षेत्रातील पावसाने वार्षिक सरासरीकडे वाटचाल केली असल्याचे दिसत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |