सातारा : गेल्या 7-8 वर्षापासून संपूर्ण जावली तालुक्यात अनाधिकृत दारु दुकानांचा सुळसुळाट झालेला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकृत दारु दुकाने बंद करण्यात आली. तरीही दारुविक्री सुरु असल्याने आता न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन या गोष्टीवर आवाज उठवणार असल्याची माहिती शिवसेना जावली तालुका प्रमुख प्रशांत तरडे यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली. पण जावलीत दारुबंदीचा शिवधनुष्य शिवसेना पेलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर मेढ्याचे पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मी दारुबंदीचे शतक साजरे करुन कामातूनच जनतेला दाखवून देणार, असा दावा केला आहे. त्यामुळे जावलीतील दारुबंदीच्या मागे पोलीस व शिवसेना तसेच व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते आहेत. मग इतर पक्ष कोणाच्या पाठीशी आहेत, याचा खुलासा होणे गरजेचे झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुका अतिदुर्गम व मागासलेला आहे. 236 गावे आणि पोलीस ठाण्यात फक्त 80 कर्मचारी कार्यरत आहेत. मेढा पोलीस ठाणे ते शिंदी वलवण या गावचे अंतर 187 किलोमीटर आहे. याठिकाणी गुन्हा घडल्यास पोलीसांना घटनास्थळी जाण्यासाठी दोन दिवस लागतात. कोयना, कण्हेर, महु-हातगेघर धरण झाल्यामुळे अनेकजण विस्थापित झालेले आहेत. काहींनी जलाशयापासून वर वस्ती केलेली आहे. या परिसरात भौगोलीक वातावरणामुळे अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे दारु व्यवसाय सुरु होता. या व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी मेढा पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून आठवड्यातून किमान तीनवेळा तरी दारुचा मुद्देमाल व आरोपी पकडले जात आहेत. त्यामुळे काही राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पूर्वी सर्वसामान्य दारु विक्रेत्याला पोलीस पकडत होते. त्यावेळी पोलिसांचे कौतुक केले जात होते. गेल्या सहा महिन्यात सपोनि जीवन माने यांनी अनाधिकृत दारु विक्रीबाबत सरपंच, नगराध्यक्ष, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणला आहे. त्यामुळे अनेकजण दुखावले असले तरी पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जावलीकर पुढे आलेले आहेत. सध्या वाळू व दारुविक्री यापेक्षाही जावलीतील सुपूत्रांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक दाखले मिळणे गरजेचे झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. या दाखल्यांमुळे युवा पिढीचे भवितव्य ठरणार आहे. याकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसर्या बाजूला वाढणार्या अनाधिकृत दारुविक्रीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत.
दारु विक्रेत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना जामिनदार, वकील मिळतो. धाडसत्र सुरु असताना पोलिसांना साक्षीदार मिळत नाहीत. वाहनामध्ये दारु सापडल्यास तो वाहन परवाना रद्द व्हावा, तसेच जेथून दारु विकत घेतली आहे, त्या दुकानाचाही परवाना रद्द व्हावा, अशा दारु विक्रेत्याला तडीपार करुन मोक्का लावावा, अशी मागणी शिवसेनेचे तरडे यांनी करुन मेढा पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करत ही कारवाई कडक करण्याचेच निर्देश दिले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी जावली तालुक्यात पोलिसांची संख्या वाढवून या दारुबंदी मोहिमेला साथ द्यावी, तसेच व्यसनापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनीही धाड पडल्यानंतर साक्षीदार व्हावे, या साक्षीदारांना शासनाने बक्षिस द्यावे, अशीही मागणी तरडे यांनी केली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |