सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आता जिल्ह्यातील लहान मुलांनाही परिचित आहे. उदयनराजेंच्या विरोधात कुलंगड्या करण्यासाठी मिस्टर रामराजे मुद्दाम सातार्यात येत असतात, असा समज खा. उदयनराजेंचा नेहमी होत असतो. आजसुद्धा मि. रामराजे येथील शासकीय विश्रामगृहात आले असता योगायोगाने खा. उदयनराजेही योगायोगाने तेथे असलेल्या पोलिसांची भंबेरी उडाल्याने त्यांनी अक्षरश: रामराजेंना कोंडून ठेवल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे दोघेही फलटण व सातारा राजघराण्यातील वंशज आहेत. परंपरागत महाराज पदाची माळ दोघांच्याही गळ्यात जन्मतः पडली आहे. स्वत:च्या मनगटावर दिल्लीच्या पातशाह आणि विजापूर, अहमदनगर, हैद्राबाद येथील शाह्यांना नमवून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालविणारे श्री. छ. उदयनराजे भोसले, तर आदिल शाहने अटक केल्यानंतर धर्म परिवर्तन करणार्या बजाजी नाईक-निंबाळकरांचा वारसा सांगणारे रामराजे नाईक-निंबाळकर या आप्तस्वकियांचा संघर्ष सातारा जिल्ह्यातील नागरिक सध्या याची देही याची डोळा पाहत आहेत.
१९९९ साली शरद पवारांच्या विरोधात मोट बांधण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसने राष्ट्रवादीत असलेल्या फलटणच्या नाईक-निंबाळकरांना व अकलूजच्या मोहिते पाटलांना गळाला लावले होते. नाईक-निंबाळकरांनी व मोहिते-पाटलांनी उदयनराजेंना आपला म्होरक्या फिक्स केले होते. मात्र, कणातीतल्या लढाईत माहीर असलेल्या पवारांनी मोहिते-पाटील व नाईक-निंबाळकरांचे बंड अगदी लिलया मोडून काढले होते. दु:खात 'शरीक' होणार्या उदयनराजेंना नाईक-निंबाळकरांनी आप्तेष्ट असूनही वार्यावर सोडून दिले होते. स्वत: मलई खाऊन उदयनराजेंना निमूटपणे खर्डा-भाकरी खाण्यास या लोकांनी मजबूर केले होते. मात्र 2009 सालच्या मतदार पुनर्रचनेत फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे मि. रामराजे ‘ना घर के ना घाट के’ झाले होते.
माढा लोकसभा मतदार संघातून स्वत: राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांनी शड्डू ठोकल्यामुळे मि. रामराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघ हा शेवटचा आशेचा किरण दिसत होता. मात्र ‘उदयनराजे फॅक्टर’ असा चालला की राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्यासमोर मि. रामराजेंना थोबाड फोडून घ्यावे लागले. २००९, २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मि. रामराजेंनी गुडघ्याला बाशिंग बांधले. पण बोहल्यावरुनच वाग्दत वधू 'नौ दो ग्यारह' झाल्यामुळे रामराजेंना शेवटपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत तेलही गेले आणि तुपही गेले, हाती आले धुपाटणे अशी अवस्था झाली. त्यानंतर मि. रामराजेंच्या ‘डोक्यात’ उदयनराजे बसले. जिथे-जिथे उदयनराजे अडचणीत येतील, त्या-त्या जागेवर त्यांना चेपविण्याची संधी मि. रामराजेंनी कधीही सोडली नाही. लोणंद येथील सोना एलॉयज, आनेवाडी टोलनाका, सुरुची राडा प्रकरण हे कोणाची देणगी आहे आणि कोणामुळे आपली मुले आजतागायत परागंदा आहेत, हे एव्हाना जिल्ह्याला समजले आहे.
तर आता मूळ मुद्यावर येवू या... गेल्या काही महिन्यांपूर्वी सभापती मि. रामराजे अशाच कुलंगड्या करण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यावेळी अपघाताने श्री. छ. उदयनराजे भोसले शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. त्यावेळी बाहेरच त्यांना रामराजेंचा दरबार भरवल्याचे समजले. त्यानंतर खा. उदयनराजेंनी तावातावाने गाडीतून उतरत ‘कुठे आहे तो, फोडतोच... असे म्हणत अजिंक्यतारा कक्षाकडे आपला मोर्चा वळवला. परंतू वेळेचे भान राखीत तत्कालीन पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी होणारी ‘फ्री स्टाईल’ कुस्ती रोखली व पुढील अनर्थ टाळण्यात यश मिळवले होते. आनेवाडी, सुरुची, सोना एलॉयज प्रकरणांमध्ये खा. उदयनराजेंना अडकविण्याची व्यूहरचना सपशेल आपटल्यानंतर दरम्यानच्या काळात अनेक योजना राबविण्यात आल्या. परंतू उदयनराजेंच्या थेट आक्रमणामुळे त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.
आजही नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचा बहाणा करुन मि. रामराजे सातार्यात आले होते. खा. उदयनराजेही त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर आले होते. मात्र, खा. उदयनराजेंच्या शासकीय विश्रामगृहाच्या आल्याच्या वर्दीने मि. रामराजेंच्या बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांची भंबेरी उडाली. यावेळी मि. रामराजेंच्या बरोबर असणार्या लवाजम्याने बंदोबस्तासाठी असणार्या पोलीसांना अजिंक्यतारा कक्षाचे दरवाजे बंद करण्यास भाग पाडले. परंतू उदयनराजे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून शासकीय विश्रामगृहातून निघून गेले. तरीही अजिंक्यतारा कक्षाचे दरवाजे उघडले गेले नव्हते. त्यामुळे दरवेळी मि. रामराजे माकडाच्या गोष्टीप्रमाणे ‘दाना दिखता है, लेकीन फंदा नहीं’ याप्रमाणे वागत असतात. दोघांच्याही या शीतयुद्धात बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांचे मात्र मरण होत असते. याचीही दखल संबंधित द्वयींनी घेतली पाहिजे.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह ठरतेय वादाचा केंद्रबिंदू
लोकसभा, विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपलेल्या आहेत. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह नेहमीच या दोघांच्या वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे रामराजेंनी आपला पारंपारिक मतदारसंघ असलेल्या फलटणमध्ये लक्ष घालावे, सातार्यात खा.उदयनराजे आहेतच, सुरुची राडा प्रकरणाच्या निमित्ताने सातार्यातील लोकांनी आणीबाणी पाहिली आहे. 'स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून' अशी भूमिका मि. रामराजेंनी बंद करावी, अशी मागणी सातार्यातील शांतताप्रिय ‘पेन्शनर्स’ करीत आहेत. सातारा ही रणभूमी असली तरी छत्रपतींची गादी आहे. त्या गादीचा आदर सरदार म्हणून फलटणच्या नाईक-निंबाळकरांनी ठेवलाच पाहिजे, अशी अपेक्षा तमाम सातारकर करीत आहेत.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |