12:26am | Sep 17, 2018 |
फलटण : गणेशोत्सवाच्या दोन वर्षांच्या वर्गणीवरून फलटणमधील दोन व्यापारी बंधूंना सहाजणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करण्यात आलेल्या एका व्यापारार्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात व्यापार्यास मारहाणीचा प्रकार घडल्याने फलटणमध्ये व्यापारी वर्गात वातावरण चिंतेचे बनले आहे.
याबाबत शहर फलटण शहर पोलिस ठाण्यात अमोल जयकुमार कोठाडिया (वय 39), रा. उमाजी नाईक चौक, फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 15 रोजी सकाळी 12:30 वाजण्याच्या सुमाराला सनमतीनगर कोळकी ऑफिसमध्ये फिर्यादी व त्यांचे मोठे भाऊ अतुल जयकुमार कोठाडिया हे काम करीत असताना 1) राजू बाळासाहेब शिरतोडे 2) कुणाल लालासो भंडलकर 3) रोहन सुभाष मदने 4) राहुल गवळी 5) अभिजीत पवार (पूर्ण नाव माहीत नाही) 6) अमोल उर्फ चंगु शिरतोडे (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व राहणार उमाजी नाईक चौक फलटण हे आले व राजु शिरतोडे याने दगडीचाळ गणेशोत्सव मंडळाची वर्गणी द्या व तुम्हाला दोन्ही वर्षाची वर्गणी द्यावी लागेल, असे म्हणाला. यावर फिर्यादीचे भाऊ अतुल कोठाडिया यांनी 2 हजार रुपये देतो, असे सांगताच शिरतोडे याने 50 हजार रुपये द्यावे लागतील द्यायचे असतील तर द्या नाहीतर काहीच नको. आम्हाला काय करायचे व कसे पैसे घ्यायचे ते माहीत आहे, असे म्हणताच कोठाडिया यांनी आम्हाला एवढे पैसे देणे शक्य नाही. आम्ही 2 हजार रुपये देऊ शकतो, असे म्हणताच राजु शिरतोडे याने अतुल यास शिवीगाळ करून गालात चापट मारली व कुणाल भंडलकर, राहुल गवळी, अभिजीत पवार, अमोल उर्फ चंगु शिरतोडे यांनी अतुल यास उचलून टेबलावर टाकले व राजु शिरतोडे याने दोघांना मारहाण केली. त्याचवेळी कुणाल भंडलकर याने तेथेच असलेली बॅट उचलुन घेऊन फिर्यादी अमोल यास पाठीत, गळ्यावर व अतुल यास डोक्यात व पाठीवर मारले. त्यानंतर तुम्ही कसा धंदा करतो ते आम्ही बघतो, असे म्हणत दमदाटी करून, शिवीगाळ करून तुमच्याकडे दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत निघून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. फिर्यादी, त्यांचे भाऊ अतुल यास खाजगी डॉक्टर यांच्याकडे प्राथमिक उपचार घेऊन घरी गेले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अतुल कोठाडिया यांना उलट्याचा त्रास सुरु झाला. यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याप्रकरणी दि. 16 रोजी फलटण शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 307, 323, 386, 452, 143, 147, 148, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस करीत आहेत.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |