06:53pm | Sep 27, 2018 |
सातारा : शिरवळ, ता. खंडाळा येथील श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिवावर एका मागासवर्गीय शिक्षिकेला जातीवाचक शिवीगाळ व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला असून याबाबतचा अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार पीडित महिला शिरवळ येथील श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती गर्ल्स हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. असे असताना श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव प्रताप चंद्रकांत देशमुख रा. शिरवळ, ता. खंडाळा हा पीडित महिलेची जाणीवपूर्वक आर्थिक व मानसिक छळ करीत होता. या अगोदर संबंधित पीडितेने प्रताप देशमुख विरोधात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे तक्रारी केल्या होत्या. परंतू या संदर्भात कसल्याही प्रकारची दखल अध्यक्षांकडून घेण्यात आली नव्हती. 26 जून 2018 रोजी सायंकाळी संबंधित शिक्षिका घरी जात असताना प्रताप देशमुख याने मला रस्त्यामध्ये अडवून मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले तसेच माझा उजवा हात धरुन पिरगाळला तसेच अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार पीडित शिक्षिकेने शिरवळ पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव प्रताप चंद्रकांत देशमुख याच्या विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |