04:41pm | Jun 09, 2019 |
सातारा : मांडवे, ता. खटाव येथे 2 जून रोजी पडलेल्या दरोड्यातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या दरोड्यातील सुमारे पाऊण लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात सातारा पोलीसांना यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आज शिवतेज हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तेजस्वी सातपुते म्हणाल्या, दि. 2 जून 2019 रोजी मांडवे, ता. खटाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच अनोळखी दरोडेखोरांनी बर्गे यांच्या घरात घुसून सुरा व लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करीत धाडसी दरोडा टाकला होता. तसेच 14 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील जाधववस्तीवर मध्यरात्री दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्ये 39 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांडवे येथील दरोड्याचा तपास करीत असताना अभिलेखावरील गुन्हेगारांनी हे दोन्ही दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अभिलेखावरील गुन्हेगार करण वरिसर्या काळे, त्याचा साथीदार ऋतुराज भावज्या शिंदे रा. काटकरवाडी, ता. खटाव व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी या तिघांनी नागेश सदाशिव भोसले रा. करपडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर हाही या दरोड्यामध्ये सहभागी असल्याची माहिती दिली. त्यानुसार सातारा पोलीसांनी नागेश भोसले यालाही ताब्यात घेतले. वरील संशयित आरोपींनी दोन्ही दरोड्यांची कबुली दिलेली आहे. खटाव तालुक्यातील मांडवे व सिद्धेश्वर कुरोली दरोड्यातील सुमारे 84 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पो. उप निरीक्षक प्रसन्न जर्हाड, सागर गवसणे, स. फौ. विलास नागे, सुधीर बनकर, आनंदराज भोईटे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेर्ले, प्रविण फडतरे, मारुती अडागळे, करिष्मा नवगणे तसेच वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल घोडके यांनी केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |