06:53pm | Apr 24, 2018 |
सातारा : प्रसारमाध्यमातील बुलेट ट्रेन अशी ओळख झालेल्या सोशल मिडियामुळे माहितीचा खजिना सापडला आहे. तसेच त्याचे फायदे-तोटेसुद्धा समोर येवू लागले आहेत. सहकार क्षेत्रात सोशल मिडियाने क्रांती केली आहे. पण एका पोस्टमुळे दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक पै यांना कर्मचार्यांनी कामकाज करु दिले नाही. या युनियनच्या शिक्षेमुळे जावली बँकेच्या सभासद, ठेवीदार व संचालकांमध्ये खळबळ माजली आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा, कोरेगाव, कराड, खंडाळा, फलटण, पाटण, खटाव, माण तालुक्यांतील कष्टकरी बांधवांनी हभप दत्तात्रय महाराज कळंबे व माजी आमदार स्वातंत्र्यसैनिक भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये जावली बँकेचे रोपटे लावले. त्याचा वटवृक्षही झालेला आहे. 35 ते 40 हजार सभासद असलेल्या या बँकेने सहकारात नावलौकिक प्राप्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी या बँकेचे सरव्यवस्थापक मधुसूदन पै यांनी एका सोशल मिडियाच्या ग्रुपवर सहकारी बँक कर्मचारी, अधिकारी युनियनचे नेते खा. आनंदराव अडसूळ हे नेतृत्व करीत असलेल्या सहकारी बँकेबाबत एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे त्या बँकेच्या कामकाजाबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी युनियनच्या माध्यमातून सरव्यवस्थापक पै यांच्यावर दबाव आणण्यासाठी जावली बँकेच्या मुंबईतील शाखेत त्यांना सकाळी बँकेच्याच कर्मचार्यांनी कामकाज करु दिले नाही. त्यामुळे त्यांना बँकेतून बाहेर पडावे लागले. सरव्यवस्थापक पै यांचे कामकाज समाधानकारक असून त्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी परिश्रम घेतले आहेत. काही अंतर्गत बदल्यांबाबत दुखावलेल्या कर्मचार्यांनी युनियनच्या माध्यमातून पै यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
मुळातच जावली बँकेच्या कामकाजाच्या बाबत कोणतीही तक्रार नसताना एका सोशल मिडियाच्या पोस्टमुळे सरव्यवस्थापक दर्जाच्या अधिकार्याची माणहानी करुन त्यांना अपमानित करणे चुकीचे आहे. याबाबत बँकेशी संबंधित अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जावली बँकेच्या पदाधिकार्यांच्या खांदेपालटाचे वारे वाहत असतानाच असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जावली बँकेत सव्वा दोनशे कर्मचारी 24 शाखांमध्ये कार्यरत असून या बँकेच्या युनियनच्या माध्यमातून चांगले निर्णय घेण्यात आले होते. परंतू प्रथमच सरव्यवस्थापकांना युनियनने सोशल मिडियामुळे शिक्षा केल्याने राज्याच्या सहकार खात्याने या गोष्टीची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होवू लागली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |