04:21pm | Mar 05, 2020 |
फलटण : मठ, मंदिरे ही ईश्वर भक्तीची ठिकाणे असून परमेश्वर तेेथे शोधण्यापेक्षा आपले आचरण, विचार आणि अंत:करण शुध्द ठेवून निस्वार्थी वृत्तीने केलेल्या कामात यश निश्चित मिळते तोच परमेश्वर असल्याचे स्पष्ट करतानाच मठ, मंदिरे असली पाहिजेत, तेथील मूर्तीच्या प्रतिकात्मक रुपातून आपल्याला परमेश्वर चिंतन निश्चित करता येत असल्याचे प्रतिपादन सेवागिरी महाराज पुसेगाव येथील मठाधीपती प.पू. सुंदरगिरी महाराज यांनी केले.
प.पू. सद्गुरु महादेवनाथ महाराज समाधी स्थळ, (शांतीधाम) वाखरी ता. फलटण येथे प.पू. सद्गुरु महादेवनाथ महाराज 7 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित 4 दिवसीय धार्मिक उत्सव आणि विविध क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कार देवून सन्मानित करण्याच्या संयुक्त कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून प.पू. सुंदरगिरी महाराज बोलत होते. यावेळी दादा महाराज देशपांडे ग्वाल्हेरकर मठाचे मठाधिपती प्रा. डॉ. प्र.ना. दिक्षीत, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, यशवंत को.ऑप बँकेचे व्हा. चेअरमन नरेंद्र उर्फ राजू भोईटे, मराठा सेवा संघाचे नानासाहेब पवार आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भक्तमंडळी आणि वाखरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
वयोवृध्द वारकरी ह.भ.प. सदाशिव राजाराम झांबरे, वयोवृध्द वारकरी ह.भ.प. निवृत्ती रामचंद्र ननवरे, वयोवृध्द शिवभक्त ह.भ.प. जगन्नाथ भिकोबा जाधव, वयोवृध्द वारकरी ह.भ.प. श्रीमती रतनबाई यशवंत भोसले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांची धान्य तुला करण्यात आली.
बालकिर्तनकार कु. दिपाली गोरवे, चौधरवाडी, हरिपाठ मुखोद्गत असलेली कु. ज्ञानेश्वरी सचिन घाडगे, चि. शंभूराज अभिजित कापसे, भगवद् गीता पाठ असलेली भाडळे ता. कोरेगाव येथील कु. अवंती अमोल राजे घोरपडे, ज्युडो कराटे स्पर्धेत विभागीयस्तरावर यशस्वी झालेली मलठण, (फलटण) येथील कु. नंदिनी महेंद्र पवार आणि मृदंगाचार्य कु. सोनू अवघडे या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तर डॉ. सौ. सीतादेवी चंद्रशेखर जगताप यांनी पी.एच.डी. पद्वी प्राप्त केल्याबद्दल आणि डॉ. कु. वेदांतिका विजय पाटील यांनी एम.बी.बी.एस पद्वी प्राप्त केल्याबद्दल त्यांना उच्च विद्या विभूषीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवकृपा सहकारी पतसंस्था मुंबईचे चेअरमन कृष्णाजी शेलार आणि सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे प्रमुख आणि सहकार भूषण हणमंतराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्थेचे चेअरमन दिलीपसिंह भोसले यांना सहकार भूषण पुरस्काराने तर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, प्रगतशील बागायतदार शिवाजीराव कदम, प्रख्यात उद्योगपती राजकुमार जाधव यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी अरुण गायकवाड, निवृत्त उपअधिक्षक प्रकाश सावंत, भारतीय सैन्यदलातील बाळासाहेब जगदाळे व किरण मोहिते, सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त अभियंता विलास गायकवाड, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे निवृत्त कुलगुरु संतराम कदम यांना सेवानिवृत्ती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाणी फौंडेशनचे सल्लागार विकास मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. प्रमोद रणवरे, निवेदक, सुत्रसंचालक व पत्रकार प्रा. अनिल धुमाळ यांना कुशल सेवा गौरव पुरस्काराने आणि यशस्वी महिला उद्योजक सौ. दिपाली कुलकर्णी, वयोवृध्द महिला वारकरी ह.भ.प. सौ. मुक्ताबाई आटोळे यांना संततुल्य नारी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याशिवाय सद्गुरु महादेवनाथ महाराज शांतीसेवा मंडळाचे विश्वस्त ह.भ.प. केशव जगन्नाथ जाधव महाराज, ह.भ.प. जे.एल. काटकर, ह.भ.प. डी.एम.घनवट आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यांना विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शांतीधाम, वाखरी ता. फलटण येथे प.पू. सद्गुरु महादेवनाथ महाराज समाधी मंदिर व शिवमंदिर उभारण्यात येत असून या मंदिरांच्या परिसरातच सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वश्री सुभाषराव शिंदे, दिलीपसिंह भोसले, कृष्णाजी शेलार, डॉ. प्रसाद जोशी, रविंद्र बेडकिहाळ, प्रमोद रणवरे, प्रकाश सुर्यवंशी, अविनाश फडतरे वगैरेंची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कु. अवंती राजे घोरपडे या बालिकेने भगवतगीतेचा 15 वा अध्याय मुखोद्गत सादर करुन वाहवा मिळविली सौ. सुधाताई पटवर्धन यांनी तीचा रोख बक्षीस देवून विशेष गौरव केला.
प्रारंभी ह.भ.प. केशव महाराज जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात पुण्यतिथी महोत्सव आणि विविध पुरस्कार वितरण या विषयी सविस्तर विवेचन केले. वाखरी या कायम दुष्काळी पट्टयातील गावात शेतीची विशेष सुधारणा करुन पाण्याच्या उपलब्धतेबरोबर आधुनिक शेती तंत्रज्ञानाद्वारे येथील शेती व शेतकरी यांना विकासाची नवी दिशा त्याचबरोबर वाखरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अध्यात्माची पार्श्वभूमी अधिक विकसित करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. प्रा. कृष्णाथ कुंभार, प्रा. दत्तात्रय ढेकळे, प्रा. अभिजित चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |