03:16pm | Jul 05, 2019 |
नवी दिल्ली : मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.५) संसदेत सादर करत आहेत. विकास आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परंपरेनुसार, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक वर्षापासून सुरु असलेली परंपरा मोडीत काढली आहे.
अर्थसंकल्प सादर करत असताना ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्याचे काम अर्थमंत्री सीतारामन यांनी केले आहे. या घटनेमुळे हा एक इतिहासच म्हणावा लागेल. सीतारामन यांनी आपण सादर करणार असलेला अर्थसंकल्प लाल कापडात गुंडाळून घेत अर्थ मंत्रालयात आल्या. सीतारामन यांच्याकडे ब्रिफकेस नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
मात्र, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी त्यामागील कारण सांगितले आहे. 'अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,' असे सुब्रमण्यन म्हणाले. आपण आता गुलाम नाही, हेदेखील सीतारामन यांनी कृतीतून दाखवून दिल्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितले. थोड्याच वेळात त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |