04:57pm | Mar 22, 2018 |
पुणे : माजी संरक्षणमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय खेळी संपूर्ण देशाला माहित आहेत. त्यांच्या राजकीय खेळी विरोधकांसह स्वकियांनासुद्धा कधीच पुरक नसतात. अशीच एक खेळी शरद पवार सध्या सुब्रमण्यम स्वामींच्या माध्यमातून खेळत आहेत. सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया गांधी यांचा कथित भ्रष्टाचार बाहेर काढून त्याचा सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व नूतन अध्यक्ष राहुल गांधी यांना अडचणीत आणण्याचे काम शरद पवार यांनी स्वामींच्या माध्यमातून केले आहे.
गांधी घराण्याचे नाव सुब्रमण्यम स्वामींच्या माध्यमातून खराब करुन आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार सुब्रमण्यम स्वामींच्या कृपेने पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही. सुब्रमण्यम स्वामी जरी भाजपमधून राज्यसभेचे खासदार असले तरी ते प्रथमपासूनच शरद पवार यांचे अतिशय निकटचे मानले जातात. कोणाला कसे अडचणीत आणायचे असल्यास पवारांचा इशारा सुब्रमण्यम स्वामींकडे असतो. त्यानुसारच सगळी राजकीय सूत्रे हलली जातात. सुब्रमण्यम स्वामी यांना पुन्हा खासदार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे खा. शरद पवार यांनी शिफारस केली होती. याची उतराई म्हणून 2019 साली होणार्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युपीएकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव येण्यासाठी स्वामींनी थेट सोनिया गांधींकडेच फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी कोणत्याही प्रकारच्या राजकीय उलथापालथी करण्यात वस्ताद आहेत. दिल्लीत शरद पवारांचा सल्ला घेवून मोदी राजकारण करतात. तर मोदींच्या डोक्यावर हात ठेवून शरद पवार मागच्या दारातून राजकीय सूत्रे हलवित आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. जातीपातीचे राजकारण करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सेना भाजपला बॅकफूटवर आणण्यासाठी खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. इकडे मोदींच्या डोक्यावर हात ठेवायचा व तिकडे कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायचे. हा उद्योग सध्या शरद पवार करीत आहेत. सध्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे पवारांच्या सुब्रमण्यम स्वामींच्या माध्यमातून पंतप्रधानपदासाठी खेळ्या सुरु आहेत, असा घणाघाती आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |