02:03am | Aug 26, 2019 |
सातारा : ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्पर्धेवर इथिओपिया व केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले.
खुल्या गटात फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) या धावपटूने १ तास १० मिनिटं आणि ६ सेकंद इतकी सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. केनियाचा हिलारी किप्टू किमोसोप दुसरा तर भारतीय धावपटूंमध्ये धन्वत प्रल्हाद रामसिंग याने पहिला, भारतीय महिला गटात स्वाती गाडवे हिने पहिला क्रमांक पटकावला.
सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला पोलिस कवायत मैदानावरुन सकाळी ६ वाजता अभुतपुर्व उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. शौर्यचक्र विजेते सुभेदार त्रिभूवन सिंग, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सातारा रनर्स फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धस सुरुवात झाली.
"नेटक्या संयोजनामुळे सातारा रनर्स फौंडेशनचे पदाधिकारी व सर्व टीम कौतूकास पात्र आहे. गिनिज बुकमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. या पुढील काळात विविध विक्रम प्रस्थापित करत सातारा हिल मॅरेथॉन आपल्या साता-याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल" अशा शब्दात श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
पोवई नाका, कर्मवीर पथ मार्गे शेटे चौक, कमानी हौद, राजपथावरुन राजवाडा- समर्थ मंदीरमार्गे बोगदा-प्रकृती रेसाॅर्ट. परत बोगदा, अदालतवाडामार्गे शाहू चौक, रविवार पेठ पोलिस चौकी, कर्मवी पथावरुन नाक्यावर धावपटू आल्यानंतर पोलिस मैदानावर स्पर्धेची सांगता झाली.
२१ किलो मिटरच्या या स्पर्धेत हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी देशभरातूनच नव्हे तर काही आंतरराष्ट्रीय धावपटू शनिवारीच साताऱ्यात दाखल झाले होते. सकाळी ९ वाजता 'फन रन' सुरू झाली. 'मै भी सिपाही' म्हणजे डाॅक्टर, पोष्टमन, वकील, रिक्षाचालक आदी विविध व्यावसाईकांचा सन्मान करणारी थीम यामध्ये राबविण्यात आली. यावेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत मोठ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. सुमारे ८ हजार ५०० स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
शिस्तबद्धता, जल्लोषी वातावरण, उत्कृष्ट नियोजनामुळे सातारा हिल मॅरेथॉनने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. या मॅरेथॉनचे नियोजन, संयोजन आणि सातारकरांच्या आदरातिथ्याबाबत येथे आलेल्या धावपटूंतून उत्स्फूर्त प्रतिक्रीया ऐकायला मिळाल्या. सोशल मिडियावरही याचे पडसाद उमटले. सोशल मीडियावर रविवारी दिवसभर या मॅरेथॉनची धूम राहिली.
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, सुभेदार त्रिभूवन सिंग, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत, दिलीप दोशी, गणेश देशमुख, राम कदम, लेफ्टनंट कर्नल रणजित नलावडे, किसनवीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव तसेच सातारा रनर्स फौंडेशनच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
पोलिस कवायत मैदानावर तत्काळ वैद्यकीय सेवा तैनात ठेवण्यात आली होती. जणू छोटा अतिदक्षता विभागच उभारण्यात आला होता. ह्रदयविकाराचा झटका आल्यास अशाप्रसंगी तत्काळ लागणारं इंजक्शनही वैद्यकीय कक्षात उपलब्ध होते. १२ डाॅक्टर ; पैकी एक पुर्णवेळ कार्डिऑलॉजीस्ट, २ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ असा चोख वैद्यकीय बंदोबस्त होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |