सातारा : सातारा शहरालगत वाढे फाटा येथे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या दिपक अंगर यादव (वय 30, रा. अवथही, गाझीयापूर, उत्तर प्रदेश) या परप्रांतीय युवकाला अटक करण्यात आली. संशयिताचा साथीदार सोनू यादव हा पसार झाला असून स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग (एलसीबी) त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, संशयिताकडून पोलिसांनी जिवंत काडतुसांसह 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु असल्याने बेकायदा शस्त्र बाळगणार्यांवर सातारा पोलिसांचा वॉच होता. शनिवारी दोघेजण सातारालगत पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुपारी वाढे फाटा येथे सापळा रचला. वाढे फाटा येथे दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्यांना हटकले. यावेळी दिपक यादव याला ताब्यात घेताच त्याचा साथीदार पसार झाला. पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे व रोख रक्कम आढळली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन संशयिताला शहर पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशीरापर्यंत संशयित दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर वाघ, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचन, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धिरज महाडीक, केतन शिंदे, मयुर देशमुख, वैभव सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |